सुभाष भामरेंनी नावं ठेवली; फडणवीसांकडून मात्र मालेगावचे कौतुक!

महिनाभर आधी मालेगाव शहरवासीयांना कोरोनाच्या संसर्गामुळे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगावला दूषणं दिली. यावरुन चांगवाल वाद पेटला होता. त्याच मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात आहे. बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात मालेगावच्या प्रशासनाचे कौतुक केले.
सुभाष भामरेंनी नावं ठेवली; फडणवीसांकडून मात्र मालेगावचे कौतुक!


मालेगाव : महिनाभर आधी मालेगाव शहरवासीयांना कोरोनाच्या संसर्गामुळे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगावला दूषणं दिली. यावरुन चांगवाल वाद पेटला होता. त्याच मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात आहे. बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात मालेगावच्या प्रशासनाचे कौतुक केले. विविध सुचनाही केल्या. काळाचा महिमा म्हणजे दूषणं देणारे खासदार डॉ. भामरे यांच्या उपस्थितीतच हे सर्व घडले. 

मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर त्याची सर्वाधिक झळ मालेगाव शहराला बसली. येथे रुग्णांची संख्या एव्हढ्या वेगाने वाढत होती, की मालेगावला महाराष्ट्राचा हॉटस्पॉट नव्हे तर कोरोनाचा ब्लॅकस्पॉट संबोधले जाऊ लागले होते. मात्र येथील प्रशासनाने घेतलेले निर्णय, उपाययोजना, समन्वय व लोकप्रबोधनासह राजकीय नेत्यांचे सहकार्य, समन्वयातून स्थिती नियंत्रणात आली. यावेळी "मालेगावचे रुग्ण धुळे येथे नको' अशी भूमिका भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली होती. त्यावरुन राजकीय वाद पेटला. त्याची पुनरावृत्ती गेल्या महिन्यात अखिल भरातीय जैन संघटनेच्या मालेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार भामरे उपस्थित राहिल्यावर, माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून नाराजी व्यक्त केली होती. यावेळी देखील खासदार भामरे आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र बुधवारी विरोधी पक्षनेते फडणवीस येथे आल्यावर त्यांनी प्रशासनाचे अप्रत्यक्ष कौतुक केले. ते देखील भामरेंच्या उपस्थितीत. त्यामुळे काळाने उगवलेला सुड म्हणावा की काय? अशी चर्चा आहे. 

उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात श्री. फडणवीस मालेगावला आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मालेगाव सुरवातीला हॉटस्पॉट ठरले होते. या काळात रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्युदर वाढला होता. चाचण्या झाल्या नसल्या तरी या काळातील मृत्यू कोरोनामुळे झाले असावेत, अशी चर्चा होती. येथील परिस्थिती, उपाययोजनांचा आज आढावा घेतला. महापालिका, पोलिस व आरोग्य प्रशासनाने प्रेझेंटेशन दिले. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने रुग्णसंख्या आटोक्‍यात आली. मालेगाव पॅटर्न काय आहे हे नेमके मला माहित नाही. मात्र रुग्णसंख्या वाढू नये यासाठी खबरदारी घ्या. प्रशासनाने यासाठी तयारी केल्याचे सांगितले. आपण रूग्णांची पाहणी केली. येथे भारतीय जैन संघटनेसह विविध स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांनी मदत केली. त्याचाही परिस्थिती आटोक्‍यात येण्यासाठी हातभार लागला. आम्हाला दबाव व भितीचे राजकारण करण्याची गरज नाही. 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, खसादार भारती पवार, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, गटनेते सुनील गायकवाड, शहराध्यक्ष मदन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, मनिषा पवार, जे. डी. हिरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर आदी या वेळी उपस्थित होते. 
... 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EbhnMwHhfCsAX8JZgEO&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=17445e9e403014da9cb2844c5b584cab&oe=5F2D0627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com