Devendra Fadanvis request roll back Export ban | Sarkarnama

फडणवीस म्हणतात, "निर्यातबंदीने शेतकरी दुःखी, निर्णय मागे घ्या' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले आहेत. विविध नेत्यांनी निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली आहे. 

नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटले आहेत. विविध नेत्यांनी निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली आहे. 

यासंदर्भात फडणवीस यांनी श्री. गोयल यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. त्यात कांदा निर्यातबंदीचे परिणाम व अडचणी याविषयी चर्चा झाली. हा संदर्भा घेऊन त्यांनी पत्रात म्हटले आहे, की आपल्याशी झालेल्या चर्चेत मी कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी विनंती केली होती. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असते. त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य व चांगला दर मिळतो. निर्यातबंदीने शेतकरी अत्यंत नाराज झाला आहे. शेतकरी वर्ग दुःखी असल्याने निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा. 

या विषयावर मंगळवारी विविध नेत्यांनी श्री. गोयल यांची भेट घेऊन निर्यातबंदीचे नकारात्मक परिणाम होणार असल्याचे विस्तृत स्वरुपात सांगीतले होते. खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. भारती पवार तसेच विविध नेत्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले होते. केंद्र शासनाने सोमवारी सायंकाळी कांदा निर्यातबंदीचा निर्णय गेतला. त्याचे परिपत्रक त्याच दिवशी निघाले. त्याची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याची सूचना असल्याने बंदरात उभे असलेले कंटेनर, शेजारच्या राज्यात जाणारे कांदा ट्रक सीमेवर अडविण्यात आले. यांसह जवळपास पाच ते सहा कोटींचा कांदा ट्रान्झीटमध्ये होता. त्याबाबत देखील या आदेशाने अनिश्‍चितता निर्माण झाली. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज निर्यातबंदी उठविण्याची मागणी केल्याने त्याला महत्वा दिले जात आहे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख