महापौर म्हणाले,  ऑक्सिजन टॅंकर देऊन फडणवीसांनी शब्द पाळला - Devendra Fadanvis kept his word & send O2 Tanker. Nashik Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महापौर म्हणाले,  ऑक्सिजन टॅंकर देऊन फडणवीसांनी शब्द पाळला

संपत देवगिरे
मंगळवार, 4 मे 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी ऑक्सिजन टॅंकर देऊ असे सांगितले. आज त्यांनी पाठविलेला टॅंकर शहरात पोहोचल्याने नाशिकसाठी त्यांनी दिलेला शब्द पाळला, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयांत ऑक्सिजनची कमतरता आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी ऑक्सिजन टॅंकर देऊ असे सांगितले. आज त्यांनी पाठविलेला टॅंकर शहरात पोहोचल्याने नाशिकसाठी त्यांनी दिलेला शब्द पाळला, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 

रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून सध्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. गेल्या आठवडयात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नाशिकला पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन तसेचदरमहा दोन ऑक्सिजन टॅंकर देऊ असे सांगितले. त्यांनी यासंदर्भात जामनगर प्रकल्पातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून नाशिकला ऑक्सिजन देण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार १९ मेट्रीक टन ऑक्सिजन असलेला हा टॅंकर शहरात पोहोचला. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या टॅंकरचे स्वागत केले. यावेळी त्यांनी टॅंकरचालकाचा सत्कार देखील सत्कार केला.  

महापौर कुलकर्णी म्हणाले, फडणवीस यांना आपल्या दौऱ्यात ऑक्सिजनचा अतिशय तुटवडा असल्याचे जाणवले. त्यांनी हॉस्पिटलचा पाहणी दौरा करून आढावा घेतला. त्यानंतर लगेचच नाशिकला  आठवडयात दोन व महिन्याला आठ ऑक्सिजन टँकर उपलब्ध करण्याची व्यवस्था करून दिली.  नाशिक शहरात कोरोनाची बिकट परिस्थिती असताना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेद्वारे ऑक्सिजन टँकर पाठवत आहेत. आजपासून फडणवीस यांच्यामुळे जादा टँकर मिळाले. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्धता होणार असल्याने नाशिककरांसाठी ही दिलासादायक घटना आहे. महापौरांनी गिरीश महाजन, प्रविण दरेकर, जयकुमार रावल यांनीही सहकार्य केल्याने आभार मानले.  

यावेळी आमदार सीमाताई हिरे, सभापती गणेश गीते, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेता सतिश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, प्रशांत जाधव,  महेश हिरे आदी उपस्थित होते. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख