जनतेची कामे होत नसतील तर निष्क्रिय आयुक्तांचा काय फायदा?.. शिवसेना गटनेत्यांचा सवाल  - Demand to replace Jalgaon Municipal Commissioner Satish Kulkarni Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

जनतेची कामे होत नसतील तर निष्क्रिय आयुक्तांचा काय फायदा?.. शिवसेना गटनेत्यांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

आयुक्त सतीश कुलकर्णी यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन दमाचा आयुक्त द्यावा, अशी मागणी  एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्तांतर  झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना नेत्यांनी आयुक्तांकडे मोर्चा वळवला  आहे. निष्क्रिय असल्याने त्यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी गटनेते व महापौर  जयश्री महाजन यांचे पती सुनील महाजन यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र 27 नगरसेकांनी बंड केल्याने महापौर, व उपमहापौर शिवसेनेचे निवडून आले आणि भाजपची सत्ता संपुष्टात आली.  संपूर्ण राज्यात हे सत्तांतर गाजले. सत्ता मिळताच शिवसेनेने महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

महाजन म्हणाले की, कुलकर्णींनी हे निष्क्रीय आयुक्त आहेत. त्यांचा प्रशासानावर कोणताही   वचक नाही. त्यामुळे महापालिकेत बेधुंद  कारभार सुरू आहे. कोणीही कोणाचे  एकत नाही. अशा परिस्थितीत जनतेची कामे करणे कठिण आहे..आम्ही जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आलो  आहोत मात्र, जनतेची कामे होत नसतील तर फायदा काय ? आयुक्त विनाकारण फाईल अडवून ठेवत असतात त्यांचा सेवानिवृत्ती काळ जवळ आल्याने ते कोणतीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यांना सेवानिवृत्ती सोपस्कार पार  पाडावयाची आहे. त्यामुळे त्यांना विकासाचे कोणतेही देणं घेणं नाही. मात्र, जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन दमाचा आयुक्त द्यावा, अशी मागणी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा : खडसेंच्या पाठपुराव्याने जळगावला  रेमडेसिव्हिरचे तीन हजार डोस
 
जळगाव : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. असे असले तरी जिल्ह्यात बुधवारी तीन हजार इंजेक्शनचे डोस प्राप्त होतील, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिली. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती दहा हजारांवर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासत असून, त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही वाढला आहे. 

 Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख