शेतकरी आंदोलनातील गोंधळ भाजप पुरस्कृत? - Delhi disturbance is BJP Consperacy. Farmers Politics. Agitaion in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी आंदोलनातील गोंधळ भाजप पुरस्कृत?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

या आंदोलनाला चिरडण्यासाठी वेळकाढूपणा केला. प्रजासत्ताकदिनी भाजप कार्यकर्त्यांना घुसवून त्यांनी गोंधळ घातला. मात्र कृषी विधेयके मागे घेईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

नाशिक : दिल्लीत सुरु असलेले शेतक-यांचे आंदोलन देशाच्या हिताचे आहे. हे आंदोलन अतिशय रास्त मागण्यांवर आहे. मात्र भाजप सरकारचा हेतू वाईट आहे. त्यांनी या आंदोलनाला चिरडण्यासाठी वेळकाढूपणा केला, असा आरोप.आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या पादधिका-यांनी दिला.

प्रजासत्ताकदिनी भाजप कार्यकर्त्यांना घुसवून त्यांनी गोंधळ घातला. मात्र कृषी विधेयके मागे घेईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. कॅांग्रेससह सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतक-यांच्या पाठीशी आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

महात्मा गांधी हौतात्म्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे उपोषण करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० विरोधात हे आंदोलन सुरु आहे. शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा यांसह इतर मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. २६ जानेवारीला दिल्लीत लाल किल्यावर भाजपचे केंद्र सरकार पूरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याचा यावेळी निषेध करण्यात आला. 

दिल्लीत लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यापुढी आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करीत आहे. त्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे हे लाक्षणिक उपोषण सायंकाळी सोडण्यात आले. यापुढेही शांततामय व अहिंसक आंदोलनाचे समर्थन करण्यात येईल. केंद्र सरकारने कितीही षडयंत्र केले तरी शेतकर्यांचे आंदोलन हे कायदे रद्द होईपर्यंत व हमीभावाचा कायदा होईपर्यंत संपणार नाही. अधिक संघटितपणे समाजातील सर्व घटकांना बोरबर घेऊन आंदोलन सुरुच राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

यावेळी राजू देसले, सुनील मालुसरे, कॅाग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कामगार नेते डॉ डी. एल. कराड, माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव, कॅांग्रेस प्रवक्त्या, नगरसेविका डॉ हेमलता पाटील, अनिता पगारे, महादेव खुडे,  व्ही. डी. धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव, किरण मोहिते, समाधान बागुल, आसिफ सर, शांताराम चव्हाण, लक्ष्मण धोत्रे, प्रभाकर वायचळे, बबलू खैरे, नाझीम काझी, निशिकांत पगारे, जगदीश पवार, भास्कर शिंदे, देविदास बोपळे, नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, मधुकर मुठाळ, राम निकम, मुकुंद रानडे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, कृष्णा शिंदे अपूर्व इंगळे, संतोष काकडे आदींसह मोठ्या संख्येने विविध संगटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख