शिवसेना म्हणते, नाशिकच्या मतदारयादीतील लाखो बोगस नावे वगळा 

जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये विधानसभेच्या नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व मतदार संघासह अन्य मतदार संघातील दोन लाख ८७ हजार ४९३ दुबार मतदार समाविष्ट करण्यात आले आहे. ते मतदार याद्यांमधून वगळावेत.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये (Voter list of Nashik district) विधानसभेच्या नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व मतदार संघासह अन्य मतदार संघातील दोन लाख ८७ हजार ४९३ दुबार मतदार (It inclueds 2.87 lacs voter names is repeated and bogus) समाविष्ट करण्यात आले आहे. ते मतदार याद्यांमधून वगळावेत, (Delete these names from voting list) अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने (Deemands Shivsena delegation) पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhre) यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे. 

सर्वाधिक दुबार मतदार नाशिक पश्चिममध्ये एक लाख २२ हजार २४२ इतके असून नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य मतदार संघात ही संख्या अनुक्रमे ८८, ९३२ आणि ७६, ३१९ इतकी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या बोगस मतदारांच्या जोरावरच नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आणि ६६ नगरसेवक निवडून आल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. ही दुबार नावे वगळली जावीत, यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत, असेही पोलिस आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघनिहाय पुढील प्रमाणे नांदगाव (१२,११७), मालेगाव (४, ५०७), मालेगाव बाह्य (११, ७१६), सिन्नर (८, ३९८), बागलाण (१२,३५४), निफाड (९,८८३), दिंडोरी (८,६२४), नाशिक पूर्व(१२,३५७), नाशिक मध्य(१२,३४७) व इगतपुरी ५,३५३. 

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात समाविष्ट झालेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघनिहाय पुढीलप्रमाणे नांदगाव (७,८८६), मालेगाव मध्य(६५५), मालेगाव बाह्य (८,२१३), बागलाण(७,१९५), सिन्नर(६,७७६), निफाड (९,१९५), दिंडोरी(८,४८३), नाशिक पूर्व (८,५९९),नाशिक मध्य (८,९७०), नाशिक पश्चिम(१०,२५१), देवळाली(८,४७८) तर इगतपुरी(४ हजार ३१). 

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदारसंघनिहाय पुढील प्रमाणे नांदगाव (६, ५७३), मालेगाव मध्य (२,२३२), मालेगाव बाह्य (६,६७४), बागलाण (५,१२८), सिन्नर (४,५३०), दिंडोरी(४,७९१), नाशिक पूर्व (९,१४२), नाशिक मध्य (१२,२४२), नाशिक पश्चिम (१०, ७२४), देवळाली(५,०८८) आणि इगतपुरी २,९४३. 

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपनेते आणि माजीमंत्री बबनराव घोलप, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदींचा समावेश होता. दुबार नावांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त पांडे यांनी शिष्टमंडळास दिले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com