भाजपची कोंडी, आमदार सीमा हिरे यांचा उड्डाणपूलाला पाठींबा

दिव्या ॲडलॅब ते सीटी सेंटर मॉल दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलाचे वातावरण तापलेले असताना आता दस्तुरखुद्द भाजपच्या नाशिक पश्चिमेच्या आमदार सीमा हिरे यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. कोणत्याही विधायक कामांना सहकार्य असणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी सिडकोवासींयाच्या मतासोबत राहणे पसंत केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Seema Hire
Seema Hire

सिडको : दिव्या ॲडलॅब ते सीटी सेंटर मॉल दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलाचे वातावरण तापलेले असताना आता दस्तुरखुद्द भाजपच्या नाशिक पश्चिमेच्या आमदार सीमा हिरे यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. कोणत्याही विधायक कामांना सहकार्य असणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी सिडकोवासींयाच्या मतासोबत राहणे पसंत केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दिव्या ॲड लॅब ते सीटी सेंटर मॉल दरम्यान होणाऱ्या उड्डाणपूलसंदर्भात काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यामध्ये महापौरांनी नगरसेवकांच्या विकासकामांची बाजू घेऊन उड्डाणपूल रद्द करावा, अशा प्रकारचे पत्र महापालिका आयुक्तांना दिल्याने हा वाद चांगलाच चिघळला होता. उड्डाणपुलाची मान्यता रद्द झाल्यास आपण राजकारण सोडू, या मुद्द्यावर शेवटपर्यंत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे ठाम असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप व शिवसेनेमध्ये चांगलेच राजकीय युद्ध रंगले होते. परंतु, असे असतानादेखील सर्वपक्षीय नेत्यांनी सिडकोचा उड्डाणपूल झालाच पाहिजे, अशी ठोस भूमिका घेतल्याने नंतर महापौरांनीदेखील विकासकामाला आपले सहकार्य असल्याचे सांगून एकप्रकारे समर्थनच केले होते. 

या दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी मात्र या वादात न पडलेले बरे म्हणून की काय मौन बाळगले होते. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, त्यांनी विधायक कामाला समर्थन असल्याचे सांगून एकप्रकारे उड्डाणपुलाला समर्थन दर्शविल्याने तमाम सिडकोवासीयांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे विकासकामासाठी प्रथमच हेवे-दावे सोडून समर्थन दर्शविल्याने सिडकोचे नागरिक व लोकप्रतिनिधींचे एकजूट असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. त्यामुळे काही अंशी का होईना उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा होणार यात तिळमात्र शंका नाही.

सकारात्मक वातावरण
नुकतेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या पक्षातील नेत्यांनी उड्डाणपुलाला पूर्णपणे समर्थन दर्शविल्याने हळूहळू उड्डाणपुलाविषयी पूर्णतः सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे सिडकोमध्ये दिसून येत आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com