कृषिमंत्री दादा भुसे म्हणतात, खासगी डॉक्टरांनी योगदान द्यावे 

मालेगावातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने कमी झाली. परिणामी, मालेगाव पॅटर्न म्हणून नावलौकिक मिळाला होता. त्याच पद्धतीने वर्तमानकाळात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुन्हा योगदान द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
Dada Bhuse covid
Dada Bhuse covid

मालेगाव : गेल्या वर्षी कोरोना काळात गल्ली-मोहल्ल्यातील सर्व लहान-मोठ्या डॉक्टरांनी जी रुग्णसेवा केली. त्यामुळेच मालेगावातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने कमी झाली. परिणामी, मालेगाव पॅटर्न म्हणून नावलौकिक मिळाला होता. त्याच पद्धतीने वर्तमानकाळात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुन्हा योगदान द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर रविवारी शहरातील सर्व खासगी डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी उपमहापौर निनीलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. जतीन कापडणीस, डॉ. मयूर शहा, डॉ. यशवंत पाटील, डॉ. इम्रान, डॉ. अभय निकम, डॉ. अदनान हिंदुस्तानवाला, डॉ. ठोके, डॉ. सऊद अन्सारी, डॉ. फारूख आबीद आदींसह आयएमएचे वैद्यकीय अधिकारी व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. भुसे म्हणाले, की रेमडेसिव्हिरचा अतिरेकी वापर घातक असल्याचे मत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यासाठी पुढाकार घ्यावा. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक पातळीवरच उपचार दिले गेल्यास त्यास डीसीएचसीपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. सामान्य रुग्णालयास पुरविण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनच्या माध्यमातून ऑक्सिजन तुटवड्यावर मात करता येत असल्याची शक्यता पडताळून आवश्यकता भासल्यास कॉन्सन्ट्रेटर मशिनची मागणी नोंदविण्यात यावी. गृहविलगीकरणासह कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना योग व प्राणायामचे धडे देऊन त्यांना वेळीच समुपदेशन करण्याबाबतही सूचना त्यांनी केल्या. 

रुग्णालय विस्तारासाठी प्रयत्न 
या वेळी खासगी रुग्णालयांचा विस्तार करण्यासह येणाऱ्या अडचणी सोडविण्याची मागणी काही खासगी डॉक्टरांनी केली. त्यावर बोलताना मंत्री भुसे म्हणाले, की स्थानिक पातळीवरील अडचणी, समस्या तत्काळ मार्गी लावल्या जातील. तसेच, वरिष्ठ पातळीवरील अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्‍न केले जातील.  
..
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com