संभाजीराजेवर टीका म्हणजे समाजावर टीका समजू!

छञपती खासदार संभाजी राजे यांनी १६ जुन पासून जाहीर केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सकल नाशिक मराठा बांधव सहभागी होतील. या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला असून कोल्हापूरच्या पहिल्या एल्गार मोर्चासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी होतील असा दावा नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.
Sambhajiraje f
Sambhajiraje f

नाशिक : छञपती खासदार संभाजी राजे (M.P. Sambhajiraje) यांनी १६ जुन पासून जाहीर केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात (Maratha reservation asitation from Kolhapur) सकल नाशिक मराठा बांधव सहभागी होतील. या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला असून कोल्हापूरच्या पहिल्या एल्गार मोर्चासाठी जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी होतील (workers from nashik will joine morcha) असा दावा नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. 

आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छञपती संभाजी राजे भोसले यांनी १६ जुनपासून आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिकला बैठक झाली. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आंदोलनासंदर्भात विचारविमर्श करण्यात आला. गाव, तालुका निहाय समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत.

या बैठकीत सामूहिक ठराव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर कोणीही वैयक्तिक टीका केल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती असो संभाजीराजेवर वैयक्तिक टीका करणे म्हणजे समाजावर टीका करणे असं समजल जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नाशिककरांवर कोल्हापूरकरांच्या वतीने जी जबाबदारी दिल्या जाईल ती पूर्ण ताक्तीनिशी पूर्ण करण्याचेही यावेळी ठरविले आहे. एवढे सगळे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य शासनाकडे मराठा समाजाच्या बाबतीत अग्रगण्य अशा पाच मागण्या केलेली असताना शासनाने अजूनही त्यावर ठोस भूमिका घेतलेली नाही निर्णय घेतलेले नाही या पाचही मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्या मान्य कराव्या यासाठी समाजात आग्रही भूमिका घेणार आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य शासनाने व केंद्र शासनाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून राज्य सरकारने करावयाच्या जबाबदाऱ्या व केंद्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत करावयाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दोन्ही सरकारने योग्य समन्वय साधून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या असा सूर देखील बैठकीमध्ये तीव्रतेने समोर आला.

यावेळी करण गायकर, शिवाजी सहाणे, राजू देसले, गणेश कदम, शरद तुंगार, योगेश कापसे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शरद शिंदे, अमित नडगे, विलास जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com