प्रणिती शिंदे दौरा; आमदार शिरीष चौधरींसह काँग्रेस नेत्यांवर गुन्हा

राज्यात सत्तेतील प्रमुख पक्ष काँग्रेसने जळगाव जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्यात गर्दी जमवत कोरोना नियम धाब्यावर बसवले. त्याची दखल घेत पोलिसांनी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्यासह २५ जणांवर गुन्हा नोंदवला.
Shirish Choudhary
Shirish Choudhary

जळगाव : राज्यात सत्तेतील प्रमुख पक्ष काँग्रेसने जळगाव जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे (Big crowd in Congress leader Praniti Shinde) यांच्या दौऱ्यात गर्दी जमवत कोरोना नियम धाब्यावर (Violet covid rules) बसवले. त्याची दखल घेत पोलिसांनी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील (Crime register against MLA Shirish Choudhary& Other leaders) यांच्यासह २५ जणांवर गुन्हा नोंदवला असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. १५) काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे जळगाव जिल्ह्यात येऊन गेल्या. या दौऱ्यात जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आले. त्यामुळे त्यांच्या स्वागताला व शासकीय विश्रामगृहात चांगलीच गर्दी जमली.

कोरोना नियमांचे उल्लंघन
फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर शासनाने कोरोनासंबंधी निर्बंध कठोर केले आहेत. राजकीय सभा, मेळावे, बैठकांवर बंदी असताना सत्तेतील पक्ष असूनही काँग्रेसने कार्यकर्त्यांची बैठक घेत नियमांचे सर्रास उल्लंघन केले.

माध्यमांच्या भूमिकेनंतर कारवाई
सत्तेतील पक्ष असल्याने पोलिस याप्रकरणी कारवाई करण्यास धजावत नव्हते. माध्यमांनी याप्रकरणी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांना दखल घेणे भाग पडले. त्यामुळे पोलिसांनी दौरा झाल्यानंतर चौथ्या दिवशी का होईना, कारवाई केली.

या नेत्यांवर गुन्हा दाखल
अजिंठा शासकीय विश्रामगृहातील बैठकीत झालेल्या गर्दीप्रकरणी काँग्रेसच्या २० ते २५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आमदार शिरीष चौधरी, अॅड. संदीप पाटील, डॉ. उल्हास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com