सुरगाण्यात मार्क्सवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पेटणार? - CPM vs NCP Political war will begune in Surgana? | Politics Marathi News - Sarkarnama

सुरगाण्यात मार्क्सवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पेटणार?

संपत देवगिरे
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

सुरगाणा या मतदारसंघावरची कम्युनिस्टांची पकड ढिली होऊ लागल्याने हा पक्ष पुन्हा एकदा मोर्चे, धरणे, सभांद्वारे सक्रीय झाला आहे. त्यामुळे येथे आता कम्युनिस्ट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पुन्हा रंगणार का? अशी चर्चा रंगली आहे. 

सुरगाणा : कम्युनिष्टांचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरुध्द काँग्रेस असा संघर्ष अनेक वर्षे येथील मतदारांनी अनुभवला आहे. या मतदारसंघावरची कम्युनिस्टांची पकड ढिली होऊ लागल्याने हा पक्ष पुन्हा एकदा मोर्चे, धरणे, सभांद्वारे सक्रीय झाला आहे. त्यामुळे येथे आता कम्युनिस्ट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पुन्हा रंगणार का? अशी चर्चा रंगली आहे.  

या मतदारसंघात पुर्वी `माकप`चे माजी आमदार जे. पी. गावित आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या समर्थकांत राजकीय संघर्ष अनेक वर्षे सुरु होता. हा संघर्ष थेट शारीरीक हल्ले, वाद या पातळीपर्यंत जात असे. त्यामुळे पोलिस, महसूल या विभागांची देखील त्यात कोंडी होत असे. गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नितीन पवार यांनी माकपचे जे. पी. गावित यांचा पराभव केला. त्यामुळे मतदारसंघावरील पकड ढिली होऊ लागल्याची माकप समर्थकांची भावना होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या माकपचे समर्थक जागरुक झाले आहे. येथे धरणे,  आंदोलन, मोर्चे पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मार्क्सवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष रंगणार का? अशी चर्चा आहे. 

यासंदर्भात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नितीन पवार यांच्या विरोधात जाहीर सभेत आक्षेपार्ह भाषा वापरून बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार जे. पी. गावीत यांचे पुत्र व पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे हा वाद चर्चेत आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, २ नोव्हेंबरला होळी चौक येथील मोर्चात कुठलाही ठोस पुरावा नसताना गावित यांनी खोटे आरोप करून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गुन्हा दाखल न झाल्यास तालुक्यात बंद ठेवत घटनेच्या निषेधार्थ जनआंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, ज्येष्ठ नेते गोपाळ धूम, नवसू गायकवाड, पंडित घाटाळ, आनंदा झिरवाळ, चंदर राऊत, सखाराम सहारे, वसंत कामडी, योगेश ठाकरे, नरेंद्र दळवी, युवराज लोखंडे, नारायण महाले, कृष्णा भोये, काळू बागूल, कृष्णा चौधरी, विजय देशमुख, आत्माराम भोये, पुंडलिक गावित, एकनाथ महाले, नितीन ब्राह्मणे, पंकज पवार, भास्कर बिरारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...
सभेतील भाषणात कोणत्याही आमदाराचा नामोल्लेख केलेला नाही. केवळ आमदार या पदाचाच उल्लेख केला आहे. त्यामुळे विधानसभा किंवा विधान परिषदेचे कोणतेही आमदार असू शकतात. भाषणाचा विपर्यास करून कोणीही गैरसमज करू नये.
- इंद्रजित गावित, उपसभापती
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख