नाशिकमध्ये कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन येईल का? - is covid19 sperading in state? Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमध्ये कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन येईल का?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे धास्तावलेल्या यंत्रणेपुढे कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन आलाय का, असा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्याचे स्पष्टीकरण होईल. मात्र, काही जिल्ह्यांमधून ‘बी अलर्ट’, यंत्रणेला ‘टोनिंग’ करा, प्रतिसाद ‘टोनअप’ करा, असे फर्मान सुटले आहे.

नाशिक : राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे धास्तावलेल्या यंत्रणेपुढे कोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन आलाय का, असा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्याचे स्पष्टीकरण होईल. मात्र, काही जिल्ह्यांमधून ‘बी अलर्ट’, यंत्रणेला ‘टोनिंग’ करा, प्रतिसाद ‘टोनअप’ करा, असे फर्मान सुटले आहे. त्याच वेळी कोरोनाने पाय पसरण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. येत्या तीन दिवसांमध्ये लग्न समारंभात कोरोनाविषयक काळजी घेण्याचे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. 

शुक्र अस्तामध्ये १७ मेपर्यंत लग्नतिथी दिसत नसल्या, तरीही काही कुटुंबांनी रामनवमीनंतर लग्नाच्या तिथी काढल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना केल्या नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. हॉल्स, लॉन्स, मंगल कार्यालयधारकांनी आणि अन्य ठिकाणी कोणताही समारंभ अथवा कार्यक्रम घेत असताना आयोजकांनी उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवायची आहे. शारीरिक अंतर राखावे, सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर बंधनकारक असेल. त्यासंबंधाने उल्लंघन झाल्यास संबंधित लॉन्स, मंगल कार्यालय अथवा ज्या जागेत कार्यक्रम घेतला, अशा जागामालकास आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल. गर्दीच्या कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्यातून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. शिवाय कोरोनाविषयक तरतुदींचे उल्लंघन झाल्यास साथरोग अधिनियम आणि तत्सम कायदेशीर तरतुदीनुसार स्थानिक पोलिस ठाण्यातर्फे कारवाई करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंटेन्मेंट क्षेत्राबद्दल काटेकोर पालन करावे. हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहांकडून नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई केली जाईल. त्याच वेळी कोरोना रुग्णांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या करण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. .

लग्नाचा किती मोठा थाट आहे, किती लोक आहेत हे तपासायचे झाल्यास लॉन्स, हॉल, मंगल कार्यालय, हॉटेल्सपुढे उभ्या असलेल्या गाड्यांच्या ताफ्यावरून लक्षात येण्यास मदत होते. सद्यःस्थितीत शंभर ते दोनशे जणांच्या मर्यादेत लग्नसोहळा होत असल्याचा दावा केला जात असला, तरीही यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांना पाचशे ते पाच हजारांपर्यंतची गर्दी उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळते. हे आता लपून राहिलेले नसल्याने मोठाली लग्ने होऊनही कारवाई होत नसल्याची खंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लग्नाची ठिकाणे तपासा, मर्यादेपेक्षा अधिक लोक असल्यास नोटीस बजावा, दंड करा आणि सुधारणा न झाल्यास गुन्हा दाखल करा, असे फर्मान सुटले आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करताहेत काय? शारीरिक अंतर पाळले जाते आहे काय, याची पडताळणी करून उल्लंघन झाल्यास नोटीस, दंड आणि नियमांचे पालन न झाल्यास कारवाई अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. हे सारे कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून किमान पावसाळ्यापर्यंत गांभीर्याने घेतले जावे, गरज पडल्यास इमारती ‘सील’ करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख