"त्या' कोरोनाग्रस्ताच्या माहितीने साऱ्या गावात पळापळ कारण... - Covid19 patients says whole village is in my Contact | Politics Marathi News - Sarkarnama

"त्या' कोरोनाग्रस्ताच्या माहितीने साऱ्या गावात पळापळ कारण...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

एका ज्येष्ठाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या संपर्कातील इतरांचे ट्रेसिंग करण्यासाठी या व्यक्तीचा संपर्क कोणाशी होता, आचार काहीही विचार न करता, "सारे गावच माझ्या संपर्कात असते. कोणाकोणाची नावे सांगू?' असे म्हणताच, त्याला रुग्णालयात घेऊन येणाऱ्यांपासून तर साऱ्या गावातच पळापळ सुरू झाली. 

कसबे सुकेणे : हे गाव तसे पुढारलेले गाव. शेती, सहकार, राजकारण अशा विविध क्षेत्रांत गावाचा दबदबा आहे. गावातील एका ज्येष्ठाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला माहिती विचारली असता, "सारे गावच माझ्या संपर्कात असते. कोणाकोणाची नावे सांगू?' असे म्हणताच, साऱ्या गावातच पळापळ सुरू झाली. पाहता पाहता ही चर्चा सगळीकडे पसरली अन्‌ हसावे की रडावे, अशी स्थिती झाली. 

या गावातही कोरोनाचा प्रवेश झाला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या संपर्कातील इतरांचे ट्रेसिंग करण्यासाठी या व्यक्तीचा संपर्क कोणाशी होता हे विचारले होते. बिनधास्त स्वभावाच्या या वीराने विचार, आचार काहीही विचार न करता, तोंड उघडले, आता सबंध गावच तीन दिवसांसाठी बंद झाले.  

येथील नावाजलेल्या घरातील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याला रुग्णालयात दाखल करून त्यांच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यासाठी बोलावून घेतले. 

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधितांना क्वारंटाइन करून उपचार सुरू करण्यात आले. कोरोनाविषयीचा उपचार म्हणून संबंधितांच्या सोशल ट्रेसिंगची माहिती संकलित करण्यात येते. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचीही तपासणी केली जाते. संशयास्पद वाटल्यास त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जातात. त्यानुसार आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला विचारले, ""तुमचा संपर्क कोणाकोणाशी आला आहे?. तुमच्या नियमित संपर्कात कोण असते?. त्यांची नावे सांगा.' यावर एरवी काहीशा विनोदी अन्‌ बिनधास्त स्वभावाच्या या व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमला, "कोणाकोणाचे नाव घेऊ. संपूर्ण गावच माझ्या संपर्कात आहे. मी कोणाचे नाव सांगू.' असे धक्कादायक विधान केले. 

त्यांच्या या उत्तराने संबंधित व गंभीर स्वभावाचे डॉक्‍टरदेखील हादरले. आता संपूर्ण गावाचे नमुने घ्यावे लागतील. गाव कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करावे लागेल. त्यासाठी आपल्याकडे पुरेसे कर्मचारीही नाहीत. ते कसे उपलब्ध होणार, असा प्रश्‍न डॉक्‍टर व त्यांच्या टीमच्या मनात रुंजी घालू लागला. संबंधित व्यक्ती घोटी (ता. इगतपुरी) येथे एका विवाहालाही गेली होती. त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्‍यता होती. त्या 64 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीने माहिती दिली. कारण विवाह सोहळ्यानंतर तीन दिवसांनी त्यांना लक्षणे दिसून लागली. पिंपळगाव बसवंत येथे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर नाशिकला एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या या उत्तराने संपूर्ण गाव क्वारंटाइन करण्याची वेळ येते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन सगळ्यांनाच त्याचा घोल लागला. ग्रामस्थांत पळापळ सुरू झाली. अखेर या रुग्णाला त्याच्या उत्तराचे परिणाम सांगितल्यावर, ते गंभीर झाले व त्यांनी माहिती दिली. त्यांच्या संपर्कातील चौदा जणांना खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. घरातील सर्व सदस्यांनाही विलगीकरण केले. एवढ्यावर न थांबता संबंध गावात तीन दिवस "जनता कर्फ्यू' करण्यात आला. कोरोना रुग्ण आढळत असल्याने हे गाव सध्या "रेड झोन'मध्ये आले आहे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख