covid
covid

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १२३ दिवसांवर

मुंबईत आजवर ५५,७८,२३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर ०.५४ टक्के आहे; तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन १२३ दिवसांवर आला आहे.

मुंबई : मुंबईत आजवर ५५,७८,२३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर ०.५४ टक्के आहे; तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन १२३ दिवसांवर आला आहे. 

आज ३,८७९ नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,६५,२९९ इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन ५१,४७२ हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर ०.५४ पर्यंत खाली आला आहे. 

मुंबईत आज दिवसभरात ७७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा १३ हजार ५४७  वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यांपैकी ५६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ५६ पुरुष; तर २१ महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. ३१ रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते; तर ४० रुग्णांचे वर ६० वर्षांच्या वर होते. 

मुंबईत गुरुवारी ३,६८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,९८,५४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ५१,४७२ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  मुंबईत १०२ इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ७२८ इतकी आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात २२,३४१ अतिजोखमीचे व्यक्ती आल्या आहेत. आज कोव्हिड काळजी केंद्र १ मध्ये अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी ९०५ जणांना दाखल करण्यात आले.  

धारावीत २४ नवे रुग्ण
धारावीत रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज २४ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ६,५६१ वर पोहोचली आहे. दादरमध्ये आज ३७ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ९,०३३ झाली आहे. माहीममध्ये ४६ रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण ९,१६८ इतके रुग्ण झाले आहेत. जी उत्तरमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तरमध्ये आज १०७ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २४,७६२ झाली आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com