नाशिकला कोरोना संसर्गाचे नवा रुग्णसंख्या कमी झाली

मंगळवारी जिल्ह्यात कोरोनामुळे ४५ जणांचा बळी गेला. दिवसभरात सहा हजार १३७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली, तर चार हजार २२४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ५३ बाधित उपचार घेत आहेत.
CORONA-VACCINE
CORONA-VACCINE

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून, कोरोनामुक्‍त रुग्‍णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्‍यू अद्यापही जास्‍त असल्‍याने चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी जिल्ह्यात कोरोनामुळे ४५ जणांचा बळी गेला. दिवसभरात सहा हजार १३७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली, तर चार हजार २२४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ५३ बाधित उपचार घेत आहेत.

मंगळवारी नाशिक शहरातील दोन हजार २२३, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ८९७ , मालेगाव महापालिका क्षेत्रातील ३६, तर जिल्ह्याबाहेरील ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील तीन हजार ३७३, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ६४२, मालेगावमधून ३४, तर जिल्ह्याबाहेरील ८८ रुग्‍णांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ७१२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी तीन हजार ७९३ अहवाल नाशिक ग्रामीण, एक हजार ५०७ अहवाल नाशिक शहर, तर मालेगावच्‍या ४१२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार १५८ रुग्‍ण दाखल झाले. यांपैकी चार हजार ८३९ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते, तर जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १७ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये २३९, मालेगावमधील ५९ रुग्‍णांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बळी

मंगळवारी कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील १६, नाशिक ग्रामीणमधील २५, मालेगाव महापालिका क्षेत्रातील चौघांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात गणेशवाडीतील ३८ वर्षीय महिला, तसेच पुष्पावती हिरेनगर, समर्थनगर, हिंम‍तनगर येथील मृतांचा समावेश आहे. मालेगावच्‍या ग्रामीण भागात कुकाणे, अंबासन, पोहाणे, साकुरी, निंबायती येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर तालुक्‍यातील सात, चांदवडमधील चार, नाशिक तालुक्‍यातील पळसे व भगूरमधील प्रत्‍येकी एकाचा मृत्‍यू झाला. निफाड, सटाणा, नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दगावले. देवळा व येवला तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com