संसर्ग आटोक्यात; ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करणार

शहरात कोरोना संसर्गाचा वेग आता आटोक्यात येत असून, रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने क्रेडाई संस्थेच्या सहकार्याने उभारलेले ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून क्रेडाई संस्थेने साडेतीनशे खाटांचे ठक्कर डोम येथे कोविड सेंटर उभारले होते.
covidf
covidf

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग आता आटोक्यात (corona spreading is in controll in city) येत असून, रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने क्रेडाई संस्थेच्या सहकार्याने उभारलेले ठक्कर डोम कोविड सेंटर बंद (Creadai`s Covied centre will be closed down soon)  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून क्रेडाई संस्थेने साडेतीनशे खाटांचे (350 bed hospital) ठक्कर डोम येथे कोविड सेंटर उभारले होते.

या कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र रुग्णसंख्येचा वेग सहा ते सात पटीने वाढल्याने शहरांमध्ये बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे महापालिकेने ठक्कर डोम कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यात आली. मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीमध्ये झपाट्याने वाढणारे रुग्णसंख्या, मे महिन्यात मात्र कमी होऊ लागली. रुग्णसंख्या कमी होत असल्याने रिक्त बेडची संख्या ५० टक्क्यांवर घसरली. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय, समाजकल्याण, मेरी या चार सेंटरमध्ये एक हजार २२५ पैकी ९७० बेड सध्या रिक्त आहे. त्यामुळे ठक्कर डोम ३२५ खाटांचे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, याऐवजी संभाजी स्टेडिअम, मेरी, मीनाताई ठाकरे कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

मनुष्यबळ तपासणार
कोरोना तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिकेकडे सध्या कार्यरत असलेले व रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे ४० बळी
जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली असताना मृत्‍यूसत्र मात्र अद्याप सुरूच आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ४० बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात सर्वाधिक २२ मृत्यू नाशिक ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात एक हजार ६६१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले.  दोन हजार ८४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वि‍रीत्‍या मात केली आहे. 

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत ४६३ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात १८ हजार ३० बाधितांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यात २८, तर नाशिक शहरातील अठरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ग्रामीण भागात सर्वाधिक सहा बळी सिन्नर तालुक्‍यातील, तर त्यापाठोपाठ निफाड तालुक्‍यातील चार, दिंडोरी व बागलाण तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन, येवला व नांदगाव तालुक्‍यांतील प्रत्‍येकी दोन आणि इगतपुरी व सुरगाणा तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ६०५, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ४९, मालेगावच्‍या सात बाधितांचा समावेश आहे. तर नाशिक शहरातील ८५८, नाशिक ग्रामीणमधील एक हजार १६६, मालेगाव महापालिका क्षेत्रातील साठ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वि‍रीत्‍या मात केली.

सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार २३२ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ६७९, नाशिक शहरातील एक हजार २३४, तर मालेगावच्‍या ३१९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९३१ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ७७९ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये १३१, तर मालेगावच्‍या दहा रुग्‍णांचा यात समावेश आहे.
.... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com