स्मशानातही वेटींग; नाशिकला १६ दिवसांत २,३६० मृत्यू

शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. मृत्यूच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोळा दिवसांत शहरातील सतरा स्मशानभूमीमध्ये तब्बल दोन हजार ३६० मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
covid 123
covid 123

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. मृत्यूच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोळा दिवसांत शहरातील सतरा स्मशानभूमीमध्ये तब्बल दोन हजार ३६० मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, यात दफनविधी करणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्‍चन, लिंगायत, गोसावी आदी समाजांतील आकडेवारी नाही. मृतांची संख्या यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीपासून शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते आठ पटींनी हा वेग जास्त आहे. आतापर्यंत शहरात दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. महापालिकेकडे बाराशेच्या वर मृतांची संख्या असल्याची नोंद दर्शविली जात असली तरी प्रत्यक्षात ही संख्या दुपटीने अधिक आहे. हा आकडा फक्त लाकडावर जाळलेल्या मृतदेहांचा आहे. त्यासाठी ६१२ टन लाकूड वापरले गेले आहे.  विद्युतदाहिनी, गॅसदाहिनीसह अन्य धर्मियांची आकडेवारी यात नाही. सोळा दिवसांत दोन हजार ३६० अंत्यसंस्कार करण्यात आले. यात सर्वाधित अंत्यसंस्कार पूर्व विभागात झाले आहेत. याच विभागात सर्वाधिक मोठे हॉस्पिटल, महापालिकेचे झाकिर हुसेन रुग्णालय आहे. त्याशिवाय शहरातील अन्य भागांतूनही पूर्व विभागातील नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी लोक येतात.

बाहेरगावचे अंत्यसंस्कार 
कोविड नियमाप्रमाणे संसर्ग वाढू नये म्हणून ज्या भागात कोविड रुग्णाचा मृत्यू झाला त्याच भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना आहेत. नाशिक शहरात उत्तर महाराष्ट्र, तसेच ग्रामीण भागातील कोविड रुग्ण उपचारासाठी आलेले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे देखील शहरातील अंत्यसंस्काराचा  आकडा मोठा दिसत आहे. 


नाशिक शहरात उत्तर महाराष्ट्रासह ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड रुग्णाचा ज्या भागात मृत्यू झाला त्याच भागात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना असल्याने शहरात मृत्यूचा आकडा वाढलेला दिसतो.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

एप्रिलमधील मृत्यू
नाशिक शहरातील विभागनिहाय कोरोनाने झालेल्या मृत्यूची संख्या अशी, कंसात अन्य कारणांनी झालेले मृत्यू. पंचवटी -४९४ (१८६), नाशिक रोड- ३९० (४४), नाशिक पूर्व- ५४५ (१०८), सिडको- ३१२ (१७८), सातपूर- ५२ (५१), एकूण १,७९३ (५६७).
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com