नाशिकमध्ये `अशी` बिले आकारल्यास रुग्णालयांविरोधात होणार ‘एफआयआर’ - COVID Bills will be preaudit by NMC in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमध्ये `अशी` बिले आकारल्यास रुग्णालयांविरोधात होणार ‘एफआयआर’

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

शहरातील कोरोनाची तपासणी, प्रतिबंध व उपचार अशा तिहेरी उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये नियमाप्रमाणे बिल लावण्यास नकार दिल्यास रुग्णालयांविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदविण्याच्या सूचना आहेत.

नाशिक : शहरातील कोरोनाची तपासणी, प्रतिबंध व उपचार अशा तिहेरी उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये  शासन नियमाप्रमाणे बिल लावण्यास नकार दिल्यास रुग्णालयांविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदविण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.  

कोरोना संदर्भात दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार  आणि आरोग्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. यावेळी कोरोना संदर्भात प्रशासकीय स्तरावर करावयाच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या होत्य. त्याची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले लावली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. ल्यानंतर महापालिका हद्दीतील ३२ प्रमुख रुग्णालयांमध्ये बिलांचे ऑडिट करण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या रुग्णालयांनी बिले तयार केल्यावर प्रारंभी त्याचे परीक्षक होईल. त्यानंतर बिले रुग्णांना दिली जाणार आहेत. 

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारापासून तर त्यांना दाखल करुन घेण्याबाबत देखील विविध तक्रारी आहेत. गेले दोन महिने याविषयी प्रशासनाकडे नागीरकांकडून मदतीसाठा संपर्क केला जोत आहे. मात्र त्याबाबत काय करावे याविषयी स्पष्ट निर्देश नव्हते. खासगी रुग्णालये प्रशासनालाही जुमानायला तयार नव्हते. उपचाराची जादा बिले आकारली जात होती. अशा तक्रारी शहरात प्राप्त झाल्या होत्या. याविरोधात शिवेसनेने थेट हेल्पलाइन क्रमांक सुरु केला होता. 

लेखापरीक्षक खासगी रुग्णालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयातील ८० टक्के बेडवर शासनाने निश्चित केलेले बिलांचे दर लावलेले असावेत. रुग्णांना देयके देण्यापूर्वी लेखापरीक्षकांमार्फत पूर्वतपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. शासन निर्देशाप्रमाणे बिले लावली आहेत की नाही, याची तपासणी करण्यात येईल. नियमानुसार बिल आकारण्यास नकार दिल्यास पोलिसांत फिर्याद नोंदविली जाणार आहे. रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य जीवनदायी योजनेत नोंदणीकृत आहे किंवा कसे याची माहिती घेऊन नसल्यास योजनेत समावेश केले जाणार आहे. रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली नसल्यास त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख