नाशिक : संपूर्ण जगभरात हातपाय पसरणारा करोना आजार अंगावर काढू नये, अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन हा आजार जीवावर बेततो. राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे सप्टेंबर पासून राज्यात कोरोना कमी होण्याची शक्यता आहे. असे दिलासादायक संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले आहेत.
डॉ. लहाने यांनी 'आरोग्य चिंतन' या फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्सन केले. 'जनतेच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांची भूमिका' या विषयावर डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन वेबिनार या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ते म्हणाले, कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावीपणे कशी कार्यरत होते, ते आपण अनुभवत आहोत. लॉकडाऊनचा निश्चितच मोठा उपयोग झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन करोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. सध्या ती संख्या 144 प्रयोगशाळांपर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या 71 खाजगी प्रयोगशाळा आहेत. उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये करोनाची मोफत चाचणी केली जाते.
डॉ. लहाने म्हणाले, सध्या करोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये सगळीकडे पाय पसरतआहे. नागरिकांना यासंदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये, कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत असल्याचे स्पष्ट होते. सहकार क्षेत्रातील डोंबिवली नागरी बॅंकेने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी योजना तयार केली आहे. याबाबत बॅंकेचे जेष्ठ अधिकारी उदय पेंडसे यांनी विषद केलेल्या माहितीवर डॉ लहाने यांनी अशा सुविधेचा नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी आरोग्य चिंतनचे सल्लागार मिलिंद आरोलकर यांनी प्रास्ताविक आणि डॉ लहाने यांचा परिचय करून दिला. संपादक वैद्य विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.
...
https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.