कोरोनापासून दिलासा...रुग्णसंख्येत घट, एकही मृत्यू नाही !

सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील स्थितीविषयी प्रशासन चिंतेत होते. मात्र काल यासंदर्भात दिलासादायक घटनांची नोंद झाली. कोरोनामुळे शहरात एकाही रुग्णाचे निधनझाले नाही. सलग आठवडाभर नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या वाढली.
कोरोनापासून दिलासा...रुग्णसंख्येत घट, एकही मृत्यू नाही !

नाशिक : सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील स्थितीविषयी प्रशासन चिंतेत होते. मात्र काल यासंदर्भात तीन दिलासादायक घटनांची नोंद झाली. कोरोनामुळे शहरात एकाही रुग्णाचे निधन झाले नाही. सलग आठवडाभर नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या वाढली. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. हे घडल्याने प्रशासनाने काही कोविड सेंटर बंद करण्याचा विचार सुरु केला. त्यामुळे कालचा दिवस शहरासाठी दिलासादायक ठरला. 

कोरोनाचा संसर्ग राज्यभरात कमी होत असल्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड नाशिक शहरात देखील दिसून आला. मंगळवारी नाशिक शहरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तब्बल १४२ दिवसांनंतर असे घडले आहे. मंगळवारी दिवसभरात  ४३४ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले. शहरात ५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. एकदंर आतापर्यंतची रुग्णसंख्या नव्वद हजार झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८१  हजार ९३७  रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होणारे रुग्ण व त्यांचे प्रमाण हे दिलासादायक ठरले आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८१  हजार ९३७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १२८ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ६१३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय उफचार घेणारे कोरोना रुग्ण असे, नाशिक ३३३, चांदवड १३२, सिन्नर ६७६, दिंडोरी ३०३, निफाड ४२९, देवळा २८,  नांदगांव २९०, येवला ११३, त्र्यंबकेश्वर १०४, सुरगाणा १६, पेठ १५, कळवण १११,  बागलाण १८२, इगतपुरी १५०, मालेगांव ग्रामीण १६८ असे तीन हजार पन्नास  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात तीन हजार १८५, मालेगांव महापालिका क्षेत्रात १५४  तर जिल्ह्याबाहेरील १३१  असे सहा हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८५.८०,  टक्के, नाशिक शहरात ९३.२७ टक्के, मालेगाव मध्ये  ९२.१३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.३३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९०.९७  इतके आहे. आतापर्यंत एक हाजर ६१३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
...
 

https://scontent.fpnq7-2.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=PeSO4OJJ3PsAX_31s5j&_nc_ht=scontent.fpnq7-2.fna&oh=e78787cbe7a4e68b3915a5e5880c01d9&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com