नाशिक : शहरात घरोघरी तसेच विविध भागात जाऊन कोरोना तपासणी सुरु आहे. यामध्ये गेल्या चोविस तासांत सर्वाधिक 629 रुग्ण नाशिक शहरात सापडले आहेत. शहरात सामान्यतः एकवीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तर सातपूर भागात हा वेग सर्वाधिक असून तेथे 18 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार ६३१ आणि मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६६९ रुग्ण आहेत. नाशिक शहरात गेल्या चोविस तासांत 629 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यातील दोन हजार 631 ऍक्टीव्ह केसेस आहेत. सोळा हजार 655 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या मिशन झीरो नाशिक या मोहिमेत सध्या एकोणीस हजार 712 पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. यामध्ये सर्वाधीक रुग्ण पंचवटी भागात चार हजार 969, सिडको परिसरात तीन हजार 697, नाशिक रोड भागात तीन हजार 157, नाशिक पूर्व भागात तीन हजार 77, सातपूर भागात दोन हजार 183 आणि नाशिक पश्चिम भागात एक हजार 630 आहेत.
शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांत 56 टक्के पुरुष तर 44 टक्के महिला आहेत. त्यात 21 ते 40 वयोगटातील सर्वाधीक सात हजार 544 रुग्ण आहेत. 41 ते 60 वयोगटातील पाच हजार 772 तर 61 वर्षे वयावरील रुग्णांची संख्या दोन हजार 18 आहे. लहान मुलांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामध्ये दहा वार्षांच्या आतील 920 तर 11 ते 20 वयोगटाचे एक हजार 632 रुग्ण आहे. सध्या एकवीस दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होतो. सिडको व नाशिक रोडला हा वेग अधिक असुन वीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. हेच प्रमाण पुर्व विभागात प्रारंभी कोरोनाचा संसर्ग मोठा होता. मात्र तेथे 32 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.
सध्या जिल्ह्यात एकोणतीस हजार ३३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी तेवीस हजार ७७७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात चार हजार ७९७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तेवीस हजार ७७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.०५ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या अशी, नाशिक २५७, चांदवड ४४, सिन्नर २२०, दिंडोरी ५०, निफाड २७०, देवळा ५६, नांदगांव ११९, येवला २८, त्र्यंबकेश्वर २१, सुरगाणा ६, पेठ ०२, कळवण २०, बागलाण १३४, इगतपुरी ७२, मालेगांव ग्रामीण १८८ असे एक हजार ४८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. नाशिक ग्रामीण २१०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४२६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०३ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ७६१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
...
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

