हॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट - Covid-19 patients no is Reducing In Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

हॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याभरात दैनंदीन रुग्णांची संख्येत घट होत असुन यात बाराशे रुग्ण घटले. 14 सप्टेबरपासून हा कल टिकून आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याभरात दैनंदीन रुग्णांची संख्येत घट होत असुन यात बाराशे रुग्ण घटले. 14 सप्टेबरपासून हा कल टिकून आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य विभागाने तपासणी व जनजागृती अधिक गतीमान केली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५४  हजार ६०१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ९ हजार २७२  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३५६  ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार १९०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशी, नाशिक ३९३, चांदवड १३२ , सिन्नर ५३६, दिंडोरी १४४, निफाड ७१३, देवळा ६१, नांदगांव २९१, येवला ७६, त्र्यंबकेश्वर ७५, सुरगाणा २२, पेठ १७, कळवण ७९,  बागलाण २१६, इगतपुरी ३९६, मालेगांव तालुका ३१५ असे तीन हजार ४६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात पाच हजार ९८, मालेगांव महापालिका क्षेत्रात ६११  तर जिल्ह्याबाहेरील ९७ असे नऊ हजार २७२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात पासष्ट हजार ६३  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात ७७.२२ टक्के, नाशिक शहरात ८७.०६ टक्के आणि मालेगाव शहरात  ७७.९९  टक्के आणि जिल्हा बाह्य रुग्णांचे प्रमाण ६८.५३  टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात ३६५, नाशिक शहरात ६५०, मालेगांव शहरात १४८  व जिल्हा बाहेरील २७ अशा एक हजार १९० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

नाशिक महापालिका हद्दीत कोरोना बाधीतांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी शहरात ५९५ नवे रुग्ण आढळले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दोन हजार १३५ आहे. आजपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या चौव्वेचाळीस हजार ४०६ आहे. यशस्वी उपचारानंतर अडतीस हजार 658 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे शहरात ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एक हजार 257 पथके घरोघर जाऊन कोरोनाची तपासणी करीत आहेत. त्यात त्यांना तीन हजार 570 पॅाझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरात दोन हजार 131 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.  त्यातून शहरात पंच्चावन्न हजार 664 लो रिस्क तर चौतिस हजार 176 हाय रिस्क नागरिक आहेत. प्रशासनाकडून उद्या (ता.22) पासून शहरात महापौरांच्या उपस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची सुरवात होणार आहे.  
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख