नाशिक जिल्ह्यात ७७ हजार ४६९ रुग्ण कोरोनामुक्त!

जिल्ह्यातील ७७ हजार ४६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत सात हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत एक हजार ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात ७७ हजार ४६९ रुग्ण कोरोनामुक्त!

नाशिक : जिल्ह्यातील ७७  हजार ४६९  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   सद्यस्थितीत सात हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत एक हजार ५४७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशी, तालुका निहाय कोरोनाचे रुग्ण - नाशिक ६३४, चांदवड १०६, सिन्नर ९३६, दिंडोरी २३०, निफाड ७१०, देवळा ४६,  नांदगांव १६६, येवला ९५, त्र्यंबकेश्वर ८८, सुरगाणा ०९, पेठ ३२, कळवण ७९,  बागलाण १७८, इगतपुरी १००, मालेगांव ग्रामीण १९५ असे तीन  हजार ६०५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ५७९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २८६  तर जिल्ह्याबाहेरील १२३ असे सात हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  ८६  हजार ६०९  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात १,५४८ रुग्णांचा मृत्यू 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्यात ८२.९१ टक्के, नाशिक शहरात ९२.३९ टक्के, मालेगाव शहरात ८८.७७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.५६ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.४५ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात एक हजार ५४८  रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. यामध्ये जिल्ह्यात ५३०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८१९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६२ व जिल्हा बाहेरील ३६ अशा एक हजार ५४८  रुग्णांचा  मृत्यू झाला आहे.  ८६  हजार ६०९  कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७७ हजार ४६९  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
...

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=NIvK7fgyBKIAX8M86Ru&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=d5dc72262023a1ba1b00f6f5b8fd3416&oe=5FAB9627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com