COVID-19 Lockdown time 900 crore Dhan purchasing from Trible | Sarkarnama

`कोरोना` काळात आदिवासी शेतक-यांकडून 900 कोटींची धान्य खरेदी

संपत देवगिरे
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

कोविड विषाणूच्या संकट काळात आदिवासी विकास महामंडळामार्फत दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात 49.18 लक्ष क्विंटल धान एक हजार 815 या किमान आधारभूत किमतीने केंद्र शासनाच्या दराने खरेदी करण्यात आले.

नाशिक : कोविड विषाणूच्या संकट काळात आदिवासी विकास महामंडळामार्फत दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात 49.18 लक्ष क्विंटल धान एक हजार 815 या किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आले, अशी माहिती आदिवासी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी दिली.

रविवारी (ता. 9) होणा-या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, याअंतर्गत  राज्य शासनामार्फत धान शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रति क्विंटल सातशे रुपयांचा जास्तीचा बोनस देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत साधारण 900 कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली असल्याची कोविड कालावधीमध्ये चार हजार शेतकऱ्यांकडून एक हजार 760 रुपये दराने मका, दोन हजार 550 रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी तसेच हमी दराने 30 कोटींचे भरडधान्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांना यामार्फत किमान हमी दर देण्यात आला. त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आली.

श्री. पाटील म्हणाले, कोविड विषाणूच्या काळात आदिवासी विकास महामंडळ त्यांच्याकडील बत्तीस हजार क्विंटल धान्य, कडधान्य अति गरीब आदिम आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत चाळीस हजार कुटुंबांना तीन हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित धान्य वाटपाचे काम सुरू आहे.

शबरी महामंडळाचे 25 कोटींचे कर्ज
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत सुमारे एक हजार 400 लाभार्थ्यांना 25 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाची योजना तयार करण्यात आली आहे. अनलॉक 3 संपल्यानंतर लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले जातील. महिलांना 4 टक्के व्याजदराने एक लाखापर्यंत कर्ज तसेच आदिवासींना लहान उद्योगांसाठी दोन लाख, बचतगट व हॉटेल व्यवसायासाठी पाच लाख व वाहनांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी दिली आहे.
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख