कोरोना चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या किट्स? - Covid-19 Kits is not as per norms says Bjp leader Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या किट्स?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोरोनाच्या चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर किट्स वापरण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणी केल्यानंतर या किटस् निकृष्ट असल्याचे पुढे आले आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
 

नाशिक : कोरोनाच्या चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर किट्स वापरण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणी केल्यानंतर या किटस् निकृष्ट असल्याचे पुढे आले आहे. मात्र त्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर ही जबाबदारी ढकलली आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

कोरोना चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या किटससंदर्भात गौप्यस्फोट करताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १ ऑक्टोबर पर्यंत भारत सरकारने आरटी-पासीआर कीटस् चा पुरवठा केला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. पण १ ऑक्टोबर पासून राज्य सरकारने खरेदी सुरु करताच अडचणी निर्माण झाल्या. कारण वैदयकीय शिक्षण विभागा अंतर्गत असणा-या डी.एम.ई.आर. ने या निकृष्ट दर्जाच्या किटस् खरेदी केल्या होत्या. या किटस् आरोग्य संचालनालय मार्फत सर्व जिल्हा पातळीवर पोहचविल्या. परंतु कोरोना रुग्णांचा पॉझीटिव्हीटी रेट कमी आल्याने ही बाब लक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.

`आरटी-पासीआर` किटस् यायच्या अगोदर जालना जिल्हयामध्ये २५ टक्क्यांच्या दरम्यान पॉझीटिव्हीटी रेट होता. परंतु या किटस् वापरल्यानंतर हा रेट ०५ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे संशय निर्माण झाल्यामुळे डॉ. हयात नगरकर यांनी याची तक्रार आय.सी.एम.आर., राष्ट्रीय विषाणू संस्था, व सिव्हील सर्जन, जालना यांच्याकडे केल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

जालना जिल्हयामध्ये रेट ऑफ इंन्फेक्शन रेट (पॉझीटिव्हीटी रेट) अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याची बाब डॉ. तात्याराव लहाने यांनी जेव्हा व्हिडोओ कॉन्फरसिंग घेतली तेव्हा डॉ. हयात नगरकर यांनी त्यांच्या समोर मांडली. पण डॉ. लहाने या गंभीर गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुलर्क्ष केले. उलट ही बाब निदर्शनास आणून देणा-या डॉ. नगरकर यांचीच कानउघडणी करण्यात आली. एवढेच नव्हेतर डॉ. नगरकर यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. या प्रकणात दोषी विभागाविरुध्द तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे किटस् पुरविणाऱ्या कंपनीला कायम स्वरुपी काळया यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केला.
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख