`कोरोना` हा आगामी काळातील आपत्तीची नांदी आहे ! - Covid-19 ic alarm for future Critical Situation | Politics Marathi News - Sarkarnama

`कोरोना` हा आगामी काळातील आपत्तीची नांदी आहे !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जागतिक आरोग्य संघटनेने `कोरोना` ही केवळ प्रासंगिक आपत्ती नाही. ती येणाऱ्या काळातील मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील ही आपत्ती आणि लॉकडाउन टाळायचे असेल, तर प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैलीचा स्विकार करावा लागेल.

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेने `कोरोना` ही केवळ प्रासंगिक आपत्ती नाही. ती येणाऱ्या काळातील मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील ही आपत्ती आणि लॉकडाउन टाळायचे असेल, तर प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैलीचा स्विकार करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध सुचना केल्या. ते म्हणाले, `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` ही केवळ मोहिम नाही. या उपक्रमातून जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा सरकारचा मानस आहे. आपल्या कुटुंब, गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणा-या प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येईल. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहचणार आहोत. त्यामुळे सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृती आपल्याला करावी लागेल. त्यात आपल्या जिल्ह्यांतील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आरोग्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करावे लागणार आहे. मला खात्री आहे, राज्यावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक त्यात सहभाग होईल. 

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या कालखंडात आपण कोरोनासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहोत. परंतु या सर्व सुविधा आपण कुठपर्यंत नेवू शकतो यालाच काही मर्यादा आहेत, त्यामुळेच आपण प्रतिबंधात्मक उपायांसाठी `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे.  काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यांनी आपल्या स्वत:सह कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यावी.  आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होवू शकत नाही.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड,  पोलिस अधिक्षक सचिन पाटील, महसूल उपायुक्त दीलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना  रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड उपस्थित होते. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख