नाशिक जिल्ह्यात ६९, १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले!

शहर व जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी घरोघर जाऊन सुमारे दोन लाख नागरिकांची तपासणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात ६९, १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले!

नाशिक : शहर व जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी घरोघर जाऊन सुमारे दोन लाख नागरिकांची तपासणी केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या एैंशी हजारांवर पोहोचली आहे. यातील एकोणसत्तर हजार रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत.  

जिल्ह्यातील ४३ लाख सात हजार ७२७ लोकसंख्येपैकी ३० लाख ८२ हजार ७६१ अशा ७१.५६ टक्के नागरिकांचे सर्व्हेक्षण माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पूर्ण झाले आहे. यामध्ये एक हजार ९४३ पथकांना नऊ हजार ४९८ जणांना आरोग्यविषयक समस्या आहेत. यामध्ये रक्तातील प्राणवायूचे प्रामण ९५ पेक्षा कमी असलेले एक हजार २३८ नागरिक आढळले आहेत.  या तपासणीत दोन हजार ५२६ नागरिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६९  हजार १७१  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ९ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या विविध कोरोना केंद्र व रुग्णालयांत उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यी अशी, नाशिक ग्रामीणमध्ये ६०६, चांदवड २०२, सिन्नर ८५८, दिंडोरी २६०, निफाड ११६३, देवळा १५७,  नांदगांव ३३०, येवला १२३, त्र्यंबकेश्वर १६३, असे चार हजार ९३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच नाशिक महापालिका क्षेत्रात चार हजार ५२, मालेगांव महापालिका क्षेत्रात ४११  तर जिल्ह्याबाहेरील १११ असे नऊ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात  ८०  हजार ११६   रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७५.२९,  टक्के, नाशिक शहरात ९०.०५ टक्के, मालेगाव मध्ये  ८५.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७३.७५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.३४  इतके आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एक हजार ४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ४८४, नाशिक महापालिका क्षेत्रात  ७६४, मालेगांव शहरात १५८  व जिल्ह्याबाहेरील ३१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com