भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असलेले संगणक चोरीला - Corruption investgation case computer stolen; Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असलेले संगणक चोरीला

दिनू गावित
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

येथील गाजलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असतानाच यासंदर्भातील पुरावे असलेल्या साहित्याचीच चोरी झाली आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायत कार्यालयातून संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह विविध साहित्य चोरीला गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

नंदुरबार : येथील गाजलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली (Corruptin investigation is at end) असतानाच यासंदर्भातील पुरावे असलेल्या साहित्याचीच चोरी झाली आहे. (a computer in which Evidence is stolen) अक्कलकुवा ग्रामपंचायत (Akkalkuva Grampanchayat) कार्यालयातून संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह विविध साहित्य चोरीला गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये काल चोरी झाल्याचा प्रकार सकाळी उघड झाला. ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची, कंप्यूटर व सहित्यांची चोरी झाली.  

पोलिस ठाण्याला सरपंच राजेश्वरी वळवी व प्रभारी ग्रामसेवक मनोज पाडवी यांनी तक्रार दिली आहे. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायत कार्यालयात चोरी झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना या ग्रामपंचायतीतून ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेले. त्यामुळे शहरांमध्ये एकच चर्चा सुरु आहे.

या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अक्कलकुवा पोलीसांकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाला गती देण्यात आली आहे.
...
हेही वाचा...

भाजप नेत्यांनी आपल्याच पक्षाची बदनामी थांबवावी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख