patel.jpg
patel.jpg

नगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन

नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले.

शिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले.

सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कारच्या (एमएच 18 एएक्स 8) इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचे निधन झाले.

शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते.

त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र होत. माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होत.

बारामतीतील दिग्गज नेते पोपटराव तुपे यांचे निधन
  बारामती :  तालुक्यातील दिग्गज नेते व बारामती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पोपटराव मानसिंग तुपे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बारामती सहकारी बँकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, मर्चंटस असोसिएशन, माळेगाव सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन या संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी कामकाज केले. बारामती नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही ते निवडून गेले होते.

सन १९८२ ते १९८५, तसेच १९८५ ते १९९५ व १९९५ ते २००५ असे जवळपास २३ वर्षे त्यांनी बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांचे वडील मानसिंगराव तुपे हे या बँकेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनीही बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. बारामतीच्या राजकारणात अजित पवार यांच्याखालोखाल त्यांना स्थान होते. मात्र २००४ मध्ये तुपे यांनी अजित पवार यांच्यापासून फारकत घेत शिवसेनेच्या तिकीटावर बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. मात्र अजित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्या काळापासून तुपे अजित पवारांपासून दुरावले होते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा पवार यांनी तुपे यांना राष्ट्रवादीत सामावून घेतले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com