Corporator Santosh Gaikwad attend Mahasabha from Khadda on Roads | Sarkarnama

शिवसेना नगरसेवक गायकवाड यांनी महासभा भरवली चक्क खड्ड्यात!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

महापालिकेची ऑनलाइन महासभा झाली. त्यात शहरातील खड्डयांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी वर्दळीच्या रस्त्यालरील खड्ड्यांमध्ये बसून सहभागी झाले.

नाशिक : आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधऩ्यासाठी आगळी वेगळी आंदोलने आजवर अनेक झालीत. मात्र काल नाशिक शहरात कमालच झाली. महापालिकेची ऑनलाइन महासभा झाली. त्यात शहरातील खड्डयांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी वर्दळीच्या रस्त्यालरील खड्ड्यांमध्ये बसून सहभागी झाले. यावेळी नागरिकांचा त्यांना पाठींबा मिळाला. 

शहरातील सातपूर विभागासह विविध भागांमध्ये पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. यामुळे महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभाग, तसेच बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी नगरसेवक गायकवाड यांनी सावरकरनगर येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून ऑनलाइन महासभेत सहभाग घेतल. तो चांगला अन् सबंध शहरभर चर्चेचा विषय ठरला. महापौर सतीश कुलकर्णी यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी शहर अभियंत्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन वजा महासभेतील सहभाग मागे घेण्यात आला. 

महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेली ऑनलाइन महासभा देखील नगरसेवक गायकवाड यांच्या खड्ड्यात बसून झालेल्या आंदोलनानेच गाजली. सातपूर प्रभागात व प्रभाग आठमधील गंगापूर रोड, सावरकरनगर, आनंदवली, नवशा गणपती परिसरासह भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

वस्तुतः ही स्थिती शहरातील सर्वच प्रभागांत आहे. अगदी भाजपचे नगरसेवक, माजी महापौरांच्या घरासमोरही अशीच स्थिती आहे. यासंदर्भा शिवसेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. गेल्या महिन्यात सिवसेनेने त्यासाठी शहराच्या विविध भागात आंदोलन केले होते. माजी महापौर व भाजप नेत्यांच्या घरासमोरील खड्डयांत वृक्षारोपण केले होते. नागरिकांना या खड्डे व नादुरुस्त रस्त्यांची सर्वाधीत झळ बसली आहे. अनेक अपघात झाले. विशेष म्हणजे यातील बुहतांश रस्ते पावसाळ्याच्या तोंडावरच डांबरीकरण केलेले आहेत. त्यामुळे त्याबाबत सत्ताधारी पक्ष व महापालिका प्रशासनाविरोधात नागिरकांत राग आहे. नगरसेवक गायकवाड यांनी आगळ्या वेगळ्या प्रकारे तो व्यक्त केला. त्यामुळे महापौरांनाही त्याची दखल घ्यावी लागली. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख