नाशिक काँग्रेसला गुड न्यूज...नगरसेवक सय्यद मुशीर यांनी केला प्रवेश!

सध्या महापालिकेतील `मनसे`च्या गटात समाविष्ट असलेले अपक्ष नगरसेवक सय्यद मुशीर यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशाची औपचारीक घोषणा केली. त्यामुळे यंदा काँग्रेसला या पक्षप्रवेशाने पहिली गुड न्यूज मिळाली आहे.
Sayyad Mushir Congress
Sayyad Mushir Congress

नाशिक : सध्या महापालिकेतील `मनसे`च्या गटात समाविष्ट असलेले अपक्ष नगरसेवक सय्यद मुशीर (Indipendent corporator Sayyad Mushir) यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन काँग्रेस प्रवेशाची (Sayyad will joine congress in presemce of Nana Patole) औपचारीक घोषणा केली. त्यामुळे यंदा काँग्रेसला या पक्षप्रवेशाने पहिली गुड न्यूज (Good News for nashik Congress) मिळाली आहे. 

यासंदर्भात आज नगरसेवक मुशीर यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात नाना पटोले व प्रवक्ते अतुल लोंढे यांची भेट घेतली. यावेळी पटोले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रवक्त्या, नगरसेविका डॅा हेमलता पाटील, नसीम खान, हनिफ बशीर यांसह  विविध पदाधिकारी व जुने नाशिक भागातील कार्यकर्ते होते. श्री. सय्यद यांच्या प्रवेशाचे श्री. पटोले यांनी स्वागत केले.

श्री. पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला प्रयान केले होते. ते नंदुरबार व धुळे येथून पुन्हा आपल्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या नाशिकला होणाऱ्या कार्यक्रमात श्री. सय्यद मेळाव्यात अधिकृतरित्या आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश करतील असे यावेळी सांगण्यात आले. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे विविध नगरसेवक पक्षांतरांच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. एकोणीस नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करण्याची बातमी यापूर्वी आली होती. अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे देखील संकेत आहेत. यादृष्टीने भारतीय जनता पक्ष देखील सावध झाला असून त्यांनी याबाबत राजकीय हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. मात्र यासंदर्भात काँग्रेस पक्षाने पहिले सावज टिपण्यात यश मिळले आहेत. गत निवडणूकीत पक्ष सोडून गेलेले विविध नगरसेवक पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सय्यद मुशीर कोण आहेत
सय्यद मुशील हे जुने नाशिक भागातील सक्रीय व आक्रमक कार्यकर्ते म्हणून परिचीत आहेत. समाजवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक शाखेच्या स्थापनेत त्यांनी यापूर्वी पुढाकार घेतला होता. ते या पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी यापूर्वी पक्षाला सोडचिठ्टी देऊन अपक्ष निवडणूक लढवली होती.
...     

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com