नगरसेविका ढोमसेंकडून अडलेल्या महिलेची महिलेची रस्त्यात प्रसूती - Corporator Bhagyashri Dhomse help labour pain women for Delivery | Politics Marathi News - Sarkarnama

नगरसेविका ढोमसेंकडून अडलेल्या महिलेची महिलेची रस्त्यात प्रसूती

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका  भाग्यश्री ढोमसे यांनी एक अडलेल्या महिलेची रस्त्यावनरच यशस्वी प्रसूती केली. या प्रकाराने परिसारतील महिलांनी नगरसेविका ढोमसे यांचे कौतुक करत शाब्बासकी दिली. 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने अनेक डॅाक्टर रुग्णांची तपासमी देखील करण्यास तयार होत नाहीत. काहींनी दवाखाने बंद ठेवले आहेत. मात्र नाशिकमध्ये कसलीही काळजी न करात आपले वैद्यकीय ज्ञान व कौशल्यपणाला लावत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका  भाग्यश्री ढोमसे यांनी एक अडलेल्या महिलेची रस्त्यावनरच यशस्वी प्रसूती केली. या प्रकाराने परिसारतील महिलांनी नगरसेविका ढोमसे यांचे कौतुक करत शाब्बासकी दिली. 

आज दुपारी संगीता संजय लोंढे (वय २६) ही सिडकोतील शिवशक्ती चौकात राहणारी गर्भवती महिला मोरवाडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी गेली होती. मात्र येथील वैद्यकीय कर्मचारी यांनी तीला परत पाठवले. त्यामुळे त्या रिक्षाने त्रिमूर्ती चौकात आल्या. तेथून पायी घराकडे जात होती. तीच्या गर्भाचे दिवस पुर्ण झाले होते. मात्र मोलमजुरी करणारी ही महिला अन्य पर्याय नसल्याने घरी निघाली होती. पायी घरी जातांना अचानक पोटात प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. ही अडलेली महिला रस्त्यातच बसली. वेदनेने ती अक्षरशः त्रस्त होऊन मदत मागू लागली. मात्र काय मदत करावी, कशी मदत करावी याबाबत सगळ्यांचाच गोंधळ झाला.

याचवेळी तेथून जाणार्‍या प्रभागातील नगरसेविका  भाग्यश्री ढोमसे यांना गर्दी पाहून त्या थांबल्या. यांनी क्षणाचाही उशीर न करता त्या महिलेच्या माहितीसाठी धावून गेल्या इतरही महिलांना त्यांनी बोलून घेतले.  काही महिला साड्या धरून उभ्या राहिल्या व त्या महिलेची सुखरूप प्रसूती झाली. रस्त्यावरच या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हे  सर्व बघण्यासाठी परिसरातील महिलाही मोठ्या प्रमाणात मदतीला धावून आल्या. विशेष म्हणजे नगरसेविका ढोमसे यांचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याबाबत त्यांना फारसे ज्ञान देखील नाही. मात्र एैकीव माहिती व धीराने त्यांनी या प्रसंगात महिलेला मदत केली. बाळाचा जन्म झाल्यावर रुग्णवाहीका बोलावून संबंधीत महिलेला रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र अक्षरशः चित्रपटात शोभावा असा प्रसंगाचे साक्षीदार यावेळी नागरिक झाले. 
 

रुग्णालयाचा हलगर्जीपणा
मनपा रुग्णालयाने सदर महिलेला ॲडमिट करून घेणे आवश्यक होते. परंतु नेहमीप्रमाणे थातुरमातुर उत्तर देऊन सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळ असल्याचे सांगून ऍडमिट करून घेणे टाळले. त्यामुळे या महिलेला रस्त्यातच प्रसूती कळा येऊन प्रसूती झाली.  सुदैवाने आई व बाळ सुखरूप आहेत.
...

 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख