'कोरोना'ने गिळले 'इतके' लिटर रसायन अन्‌ पाणी 

धुळे महापालिकेकडून आतापर्यंत पाच हजार 263 लिटर "सोडिअम हायपोक्‍लोराईट' रसायनाचा वापर झाला. खर्चाचा विचार केला तर चार लाख 21 हजार रुपये या रसायनावरच खर्च झाला आहे.
4Pune_Experts_advise_against.
4Pune_Experts_advise_against.

धुळे : सॅनिटायझर, सॅनिटायझेशन हे आता शब्द "कोरोना'मुळे सध्या सर्वांच्याच तोंडपाठ झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, की महापालिकेची यंत्रणा संबंधित भागात सॅनिटायझेशनसाठी पोहोचते. या सॅनिटायझेशनसाठी धुळे महापालिकेकडून आतापर्यंत तब्बल पाच हजार 263 लिटर "सोडिअम हायपोक्‍लोराईट' रसायनाचा वापर झाला. खर्चाचा विचार केला तर तब्बल चार लाख 21 हजार रुपये निव्वळ या रसायनावरच खर्च झाला आहे. पाण्याचा विचार केला तर या रसायनाच्या फवारणीसाठी तब्बल साडेआठ लाख लिटर पाणी वापरले गेले.

धुळे शहरात "कोरोना'चा शिरकाव होण्यापूर्वीच महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या होत्या. यात ठळकपणे नजरेस पडणारी उपाययोजना म्हणजे जंतुनाशकाची फवारणी. महापालिकेने शहरात मार्चमध्येच ही फवारणी सुरू केली होती. 20 एप्रिलला धुळ्यात "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळला आणि या प्रक्रियेला आणखी वेग आला. ठिकठिकाणी सॅनिटायझेशन अथवा जंतुनाशकांच्या फवारणीसाठी महापालिकेकडून सोडिअम हायपोक्‍लोराईट या रसायनाचा वापर होत आहे. महापालिकेने सहा हजार लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईटची खरेदी केली आहे.

"कोरोना' संसर्गाचा धोका सुरू झाल्यानंतर त्यातही शहरात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्यानंतर साधारण दीड-दोन महिन्यांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजअखेर पाच हजार 263 लिटर सोडिअम हायपोक्‍लाराईटचा वापर झाला आहे. महापालिकेने साधारण 80 रुपये प्रतिलिटर दराने चार लाख 80 हजार रुपये खर्च करून सहा हजार लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईट खरेदी केले. यापैकी आजअखेर चार लाख 21 हजार रुपयांचे रसायन वापरले गेले. कोरोनाचा धोका कायम असल्याने यावर यापुढेही खर्च होणार आहे.


 
असा वापर, अशी यंत्रणा

धुळ्यात हजार लिटर पाण्यात सहा लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईट (सर्वसामान्य भागात), हजार लिटर पाण्यात दहा लिटर सोडियम हायपोक्‍लोराईट (पॉझिटिव्ह रुग्णाच्या भागात), फवारणीसाठी पाच वाहनांचा वापर, हातपंपाद्वारे फवारणीसाठी 20 कर्मचारी, सॅनिटायझेशनसाठी एकूण 30 कर्मचारी, फवारणीसाठी सोडियम हायपोक्‍लोराईट व पाण्याचे प्रमाण याचा हिशेब केला तर पाच हजार 263 लिटर रसायनाचा वापर झाल्याने एक हजार लिटर पाण्यात सहा लिटर रसायन, असे प्रमाण गृहीत धरले तर तब्बल आठ लाख 77 हजार 166 लिटर पाण्याचा यासाठी वापर झाल्याचे दिसते. अर्थात, रसायन व पाण्याचे प्रमाण ठिकठिकाणी कमी - जास्त आहे. त्यामुळे पाणी वापराची ही आकडेवारी थोडी कमी होऊ शकते. 

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा नक्की फायदा की तोटा?


 नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा दुष्परिणांमावरुन मोठा वादंग सुरू असताना आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या गोळ्यांमुळे कोणतेही मोठे दुष्परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही, असे म्हटले आहे. या गोळ्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत असेही संशोधनात आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यास नुकतीच स्थगिती दिली आहे. या गोळ्यांमुळे मृत्यूही होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याला आता 'आयसीएमआर'ने प्रत्युत्तर दिले आहे. संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा एक नवाच आजार आहे. त्यावर योग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपचार काय हे जगात कोणालाच अजून माहिती नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या मुख्यतः मलेरियावर दिल्या जातात. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून त्यांना अमेरिकेपासून जगभरातून वाढती मागणी आहे. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते. मात्र या गोळ्यांच्या सरसकट आणि अतिवापराबद्दल खुद्द आरोग्य मंत्रालयाने मध्यंतरी सावधगिरीचा सल्ला दिला होता. रिकाम्यापोटी जे या गोळ्या घेतात त्यांना चक्कर येणे यासारखे विकार उद्भवू शकतात, असे आज स्पष्ट करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com