नाशिकला कोरोना आटोक्यात येईना; दिवसभरात ६५ मृत्‍यू

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंनी गंभीर रूप धारण केले आहे. मंगळवारी (ता. २५) दिवसभरात ६५ बाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यात नाशिक शहरातील सर्वाधिक ३८ बळींचा समावेश आहे.
Covid
Covid

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असली, (Corona patients number down) तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंनी गंभीर रूप धारण केले आहे. मंगळवारी (ता. २५) दिवसभरात ६५ बाधितांचा (65 Deaths on Tuesday) मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, यात नाशिक शहरातील सर्वाधिक ३८ बळींचा (Nashik City have highest 38 deaths) समावेश आहे.

जिल्‍ह्यात कोरोना मृत्‍यूचा महाविस्‍फोट सुरूच असून, पाचव्‍यांदा पन्नासपेक्षा अधिक बाधितांच्या दिवसभरात मृत्‍यूची नोंद झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात १४ हजार ४०० ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण आहेत.

तीनच दिवसांपूर्वी गेल्‍या रविवारी (ता. २२) जिल्‍ह्यात ५८ बाधितांचा बळी गेला होता. यापूर्वी एप्रिलमध्ये सलग तीन दिवस मृतांची संख्या पन्नासपेक्षा अधिक राहिली होती. दरम्‍यान, मंगळवारी जिल्‍ह्यात कोरोनामुळे ६५ बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद झाली आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३८, नाशिक ग्रामीणमधील २४, तर मालेगावच्‍या तिघांचा समावेश आहे. शहरात सिडको, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड भागातील मृतांचे प्रमाण अधिक आहे. तसेच शहराला लागून असलेल्‍या देवळाली कॅम्‍प येथील एक, तर शिंदे गावातील दोन मृतांचा नाशिक ग्रामीणमधील मृत्‍युसंख्येत समावेश आहे. ग्रामीण भागात इगतपुरीत चार, येवल्यासह सटाणा, सिन्नर तालुक्‍यातील प्रत्‍येकी तिघांचा मृत्‍यू झाला आहे. निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन मृत्‍यू झाले आहेत, तर मालेगाव ग्रामीण व नांदगावच्‍या प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला.

मंगळवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३३७ पॉझिटिव्‍ह आढळले असून, नाशिक ग्रामीणमध्ये ४११, मालेगावच्‍या १७ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. दुसरीकडे नाशिक महापालिका क्षेत्रात २२५, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार २७२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. कोरोनामुक्‍तांमध्ये मालेगावच्‍या ४७ रुग्‍णांचा समावेश आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत जिल्‍ह्यात तीन हजार ६२० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ११८, नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ३१७, तर मालेगावच्‍या १८५ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५९७ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ४४७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ९०, तर मालेगावच्‍या ४५ रुग्‍णांचा यात समावेश आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com