जमावबंदीचे दहा हजार गुन्हे, त्यात राजकीय नेता औषधालाही सापडेना!

कोरोनामुळे शहर-जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे दहा हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर पडून वाहनावर फिरणाऱ्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारत सुमारे अडीच हजार वाहने शहर-जिल्हा पोलिसांनी जप्त केली आहेत.
जमावबंदीचे दहा हजार गुन्हे, त्यात राजकीय नेता औषधालाही सापडेना!

नाशिक : कोरोनामुळे शहर-जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे दहा हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. अडीच हजार वाहने पोलिसांनी जप्त केली. यात शहरात सर्वाधिक वाहने जप्त झाली. मात्र या कारवाईत गावभर भटकणारे नेते, कार्यकर्ते सही सलामत सुटले. कारवाई झाली ती सामान्यांवरच.  

नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत सहा हजार नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल आहेत. शहरात सर्वाधिक एक हजार गुन्हे गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्यांची दोन हजार वाहने जप्त करण्यात आली. लॉकडाउनमध्ये नियमांकडे दुर्लक्ष करून शहरात वावरणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. परिमंडळ एकमधील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तीन हजार आठशे आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन हजार शंभर गुन्हे दाखल आहेत. विनामास्क फिरणाऱ्या एक हजार पाचशे नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत. 

जिल्ह्यातही सुमारे पाच हजार गुन्हे लॉकडाउनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्या पाच हजार बेशिस्तांवर ग्रामीण पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाउनदरम्यान जिल्हाभरात पोलिस यंत्रणेकडून सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या तब्बल पाच हजार जणांवर गुन्हे दाखल आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांची सहाशे वाहने जप्त झाली आहेत.

शहरातील विविध पोलिस ठाणेनिहाय गुन्ह्यांची संख्या अशी, आडगाव (206), म्हसरूळ (183), पंचवटी (292), भद्रकाली (753), सरकारवाडा (891), गंगापूर (1048), मुंबई नाका (430), अंबड (290), इंदिरानगर (291), सातपूर (547), उपनगर (325), नाशिक रोड (439), देवळाली कॅम्प (238). संचारबंदी, जमावबंदीचे पाच हजार 933 गुन्हे दाखल झाले. शहरात या दरम्यान पोलिसांनी दोन हजार 163 नागीरकांची वाहने जप्त केली. एक हजार 568 जणांवर मास्क न वापरल्याचा गुन्हा दाकल करणत आला आहे. 
.... 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आदेशाचे पालन करावे. त्यामुळे संसर्ग साखळी खंडीत करण्यास मदत होईल. यासंदर्भात पोलिस कारवाई सुरुच राहील. - डॉ. आरती सिंह,  जिल्हा पोलिस अधीक्षक. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com