सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक करा ! - Congress workers should be a Corporator. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक करा !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

शहरातील वडाळा परिसरातील महिला आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्थानिक नागरी प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्याबाबात विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करुनही काहीच उपयोग झाला नाही.

नाशिक : शहरातील वडाळा परिसरातील महिला आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्थानिक नागरी प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्याबाबात विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करुनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम या पक्षाकडून होईल असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी व्यक्त केला.      

अल्पसंख्यांक विभाग काँग्रेसच्या वतीने वडाळा गावात मोठ्या संख्येने महिला, तरुणांनी प्रवेश केला. अध्यक्षपदी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर होते, 

यावेळी श्री आहेर म्हणाले, काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. परंतु सध्याचे भाजप शासित सरकार हे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी फक्त जनतेची दिशाभूल करीत आहे. आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा तशाच प्रकारचा असून याच्यामध्ये नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या भाजपशासित सरकारने केलेले आहे.

यावेळी डॉक्टर हेमलता पाटील यांनी महिलांसाठी तयार केलेल्या काँग्रेस पक्षांच्या योजनांची आठवण करून दिली. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी व गरीब जनतेसाठी असंख्य योजना तयार करून देशाला बहाल केल्या. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी 50 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले. आगामी काळामध्ये येऊ घातलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने जनतेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवावे. पारंपारिक पद्धतीने मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे असतानासुद्धा काही तरुण महिला व पुरुष काँग्रेस पक्षाच्या विचारापासून दूर गेल्यामुळे काँग्रेस पक्षाला अपयश आले अशी खंत व्यक्त केली.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष बशीर यांनी आगामी काळामध्ये संपूर्ण मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी रहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी महिला कॉंग्रेस अध्यक्षा वत्सलाताई खैरे, नगरसेविका आशाताई तड़वी, निलेश (बबलू) भाऊ खैरे, युवा नेते जावेद भाई पठाण, ज्युलीताई डिसूज़ा दाऊद भाई शेख, तौफीक शेख, अन्नाजी मोरे, कैलासजी कडलग, नागरगोजे सर, गोपाल शेठ जगताप, अतीक आत्तार, नजीर मौला, बशीर सय्यद, मोबिन पठाण, सलमान शेख उपस्थित होते. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख