Congress workers agitaion against onion Export Ban | Sarkarnama

काॅंग्रेसचे कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदी विरोधात आंदोलन

संपत देवगिरे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करुन कोणाचे हित पाहिले आहे?. शेतकरी संकटात असतांना भाजपचे सरकार व लोकप्रतिनिधी कधीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मात्र कांदा निर्यातबंदी करुन त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे.

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करुन कोणाचे हित पाहिले आहे?. शेतकरी संकटात असतांना भाजपचे सरकार व लोकप्रतिनिधी कधीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मात्र कांदा निर्यातबंदी करुन त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. त्याविरोधात हजारो शेतकरी, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. मात्र तरीही भाजपचे सरकार जागे होत नसेल, तर त्यांना झटका द्यावा लागेल, असा इशारा आज कॉंग्रेसतर्फे देण्यात आला. 

नाशिक शहर कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. सोमवारी सायंकाळी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी जाहीर केली. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. नाशिकसह विविध भागात शेतकरी, विविध संघटना, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. आज शहर कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यातबंदी कोणाच्याच हिताची नाही. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहे. त्यांच्या धोरणारे देशाची आर्थिक घडी विस्कटली. सामानम्य नागरिक संकटात आहे. महागाई वाढली आहे. शेती मालाचे भाव कोसळले. अशा स्थितीतही शेतकरी कसा बसा धडपड करुन पिके घेत आहे. त्यावर केंद्र सरकार आपल्या धोरणाची कुऱ्हाड चालवित आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा पावसाने खराब झाला आहे. सध्याचा कांदा साठवून ठेवता येत नाही. अशा स्थितीत जो थोडा कांदा शिल्लक आहे, त्याला थोडा दर मिळत असेल तर सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र सध्याचे धोरण शेतकऱ्यांना संकटात लोटत आहे. कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास त्याचा अतिशय विपरीत परिणाम कांदा बाजारपेठ, कांदा उत्पादक शेतकरी आणि बाजार समित्यांचवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास आमकी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

पंतप्रधान कांदा विसरले! 
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुक प्रचारासाठी आले होते. तेथे त्यांनी सभा घेतली. त्यात मी नाशिकचा कांदा खातो. हा कांदा अतिशय चांगला असतो. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी कधीच विसरणार नाही. आमचे सरकार सदैव कांदा उत्पादकांच्या पाठीशी राहील असे विधान केले होते. सत्तेत आल्यापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?. आता तर निर्यातबंदी जाहीर करुन त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सुड उगवला आहे. यातून हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते. 

यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, सुरेश मारु, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका आशाताई तडवी, हनीफ बशीर, उद्धव पवार, सचिन दीक्षित, अनिल कोठुळे, जावेद इब्राहीम, रामकिसन चव्हाण, कैलास कडलग, आकाश घोलप, आण्णा मोरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख