शिवसेना-भाजपही भांडत होतेच ना. मग आता मी बोललो त्यात गैर काय?

विरोधी पक्ष राज्यातील प्रथा आणि परंपरा मोडीत काढत आहे
4nana_4 - Copy.jpg
4nana_4 - Copy.jpg

फैजपूर (जळगाव) :  "स्वबळावर निवडणुक लढविणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. गेल्या युती सरकारमध्ये शिवसेना, भाजपही भांडत होतेच ना. मग आता मी बोललो त्यात गैर काय,"  असा  सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. Congress state president Nana Patole criticizes Shiv Sena BJP

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे मी बोललो आणि माध्यमांनी तेच लावून धरले आहे. आता सत्तेत असलेल्या पक्षांनी स्वबळावर लढण्याचे घोषित करणे महाराष्ट्राला नवीन आहे का ? या पूर्वी गेल्या पाच वर्षांत राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते, ते तर अगदी नळावरचे भांडण असल्याप्रमाणे भांडत होते. स्ववळावर लढण्याचा प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे. त्यामुळे आपण बोललो. त्यात कोणतेही नाविन्य नाही. 

फडणवीस, दरेकर रेमडेसिविरचे 'दोन वीर'
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव न घेता रेमडेसिविरचे दोन वीर असा नाना पटोले यांनी यावेळी त्यांनी केला.  ते म्हणाले की,  राज्यातील विरोधी पक्ष राज्यातील प्रथा आणि परंपरा मोडीत काढत आहे, रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांना सोडविण्यासाठी मध्यरात्री दोन वीर कायदा आणि परंपरा मोडीत काढून पोलिस ठाण्यात गेले होते.

आताही याच विरोधी पक्षांनी अधिवेशन घेण्यावरून वाद सुरू केला आहे. बिझनेस अँडव्हिझरी  कमेटीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे मिळून अधिवेशन कालावधी ठरवीत असतात, त्या ठिकाणी निर्णय घेताना विरोधी पक्षाचे लोक काही बोलले नाहीत, मात्र बाहेर येऊन दोन दिवसाच्या अधिवेशनावर टीका करतात हे योग्य नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; बंडाचा झेंडा उगारला 
विरार : मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. व्यास यांच्या निवडीला माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. जिल्हाध्यक्ष बदलला नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान होईल, असा इशारा पक्षाला देत बंडाचा झेंडा उगारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com