कॉंग्रेसचे राहुल दिवे म्हणाले, पोस्ट लॉकडाउन कार्यक्रम आवश्‍यक

महापालिका प्रशासनाने यासंदर्भात निश्‍चित धोरण ठरवावे. कॉंग्रेसतर्फे यासंदर्भात शहरात प्रबोधनाचे काम सुरु करण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव, नगरसेवक राहुल दिवे यांनी सांगीतले.
कॉंग्रेसचे राहुल दिवे म्हणाले, पोस्ट लॉकडाउन कार्यक्रम आवश्‍यक

नाशिक : कोरोना लॉकडाउन अंतिम चरणात आहे. त्यामुळे लवकरच लॉकडाउन संपुष्टात येईल. लॉकडाउनमधून बाहेर पडतांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंदर्भात निश्‍चित धोरण ठरवावे. कॉंग्रेसतर्फे यासंदर्भात शहरात प्रबोधनाचे काम सुरु करण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव, नगरसेवक राहुल दिवे यांनी सांगीतले. 

नगरसेवक दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी शंभर वॉशेबल पीपीई किटस्‌ देण्यात आले. आज महापालिका कार्यालयात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे हे कीटस्‌ सुपुर्त करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागीरकांचे सहकार्य व सहभाग दोन्हींची आवश्‍यकता आहे. गेले साठ दिवस शहरात लॉकडाउन होते. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात यश आले आहे. या कालावधीत रेल्वे, बस, रिक्षा यांसह सर्व सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये आणि मंगल कार्यालये, चित्रपटगृह, हॉटेल्स यांसह काही शासकीय कार्यालये देखील बंद होती. यापुढे लॉकडाउनमधून बाहेर येतांना टप्प्या टप्प्याने या सेवा सुरु होतील. त्यातून सार्वजनिक ठिकाणी अचानक गर्दी उसळू शकते. नागरीक दिर्घकाळ घरात राहिल्याने ते बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत सॅनीटायझेशन, फिजीकल डिस्टन्स, परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरण याविषयी प्रशासनाने पाठपुरावा केला पाहिजे. अन्यथा या गोष्टींचे पालन झाले नाही तर अडचणी निर्माण होतील. यावेळी महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. 

दरम्यान श्री. दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शहरात तसेच त्यांच्या प्रभागात कोरोना विरोधात सामाजिक जागृतीसाठी शहरात दिवसभर उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी नगरसेविका आशाताई तडवी, अनिल जोंधळे, रफिक तडवी, मिलिंद सुर्यवंशी, संजय गायकवाड, संजय लोखंडे, महेश बाफना, सचिन पगारे, गौरव केदारे, तुषार सोनकांबळे, मंगेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com