जिल्ह्यात काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू!
Nana Patole

जिल्ह्यात काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या सूचना केल्या असून, त्यांच्याशी याबाबत बुधवारीच चर्चा झाल्याचे सांगत जिल्ह्यातही स्वबळावर लढण्यासाठी संघटनात्मक तयारी सुरू असल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या सूचना केल्या असून, (Nana Patole instruct on its own in upcoming election) त्यांच्याशी याबाबत बुधवारीच चर्चा झाल्याचे सांगत जिल्ह्यातही स्वबळावर लढण्यासाठी संघटनात्मक तयारी सुरू (Congress is starts working on it in Jalgaon) असल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Dr Ulhas Patil) यांनी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, की नाना पटोलेंनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर संघटनेत चैतन्य निर्माण झाले आहे. नंतरच्या टप्प्यात पटोलेंनी राहुल गांधींची भेट घेतली व आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात मान्यता मिळविली. त्यादृष्टीने पक्षाची तयारी सुरू झाली आहे. पटोलेंशी याबाबत बुधवारीच मोबाईलवरून संवाद साधला. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही पक्ष म्हणून जिल्ह्यात त्यासाठी तयारी सुरू केल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

दरम्यान काँग्रेसने स्वबळावर निवडणूकीच्या वक्तव्यांनतर महाविकास आघाडी सरकारमध्ये भिन्न मतप्रवाह तयार झाले होते. याबाबत पक्षातूनच त्यावर सावध प्रतिक्रीया व्यक्त होत होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नान पटोले उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे स्वबळाचा नारा कितपत तग धरेल असे प्रश्नचिन्ह होते. मात्र त्यानंतर जळगाव जिल्ह्यात तेच वारे पुन्हा वाहू लागले आहेत.
...  
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in