आमदार फरांदेंनी भीमवाडीच्या रहिवासीयांना महापालिकेची काय मदत दिली?

आमदार देवयानी फरांदे यांनी भीमवाडीच्या असहाय्य लोकांच्या हाती फलक देऊन भाजपचे आंदोलन केले. त्यांना खरेच या लोकांविषयी कळवळा असेल, तर महापालिकेत त्यांचीच सत्ता आहे. महापौरांकडून मदत मिळवून द्यावी..
आमदार फरांदेंनी भीमवाडीच्या रहिवासीयांना महापालिकेची काय मदत दिली?

नाशिक : आमदार देवयानी फरांदे यांनी भीमवाडीच्या असहाय्य लोकांच्या हाती फलक देऊन भाजपचे आंदोलन केले. त्यांना खरेच या लोकांविषयी कळवळा असेल, तर महापालिकेत त्यांचीच सत्ता आहे. महापौरांकडून मदत मिळवून द्यावी. घरे द्यावीत. यातले त्या काय करणार आहेत हे सांगावे, असे आव्हान कॉंग्रेसच्या प्रतोद डॉ. हेमलता पाटील यांनी दिले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील भीमवाडी झोपडपट्टीतील आगीत घरे नष्ट झालेल्या लोकांसह धरणे आंदोलन केले होते. याच दिवशी भाजपचे "मेरा आंगण, मेरा रणांगण' हे आंदोलन देखील होते. त्यामुळे या आंदोलनाने कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या आणि नगरसेविका डॉ. हेमलता पाटील चांगल्याच संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, भीमवाडी झोपडपट्टीला आग लागली तेव्हा सर्वप्रथम तेथे पोहोचणारी मी होते. आम्ही सर्व संबंधीतांशी संपर्क करुन या संकटग्रस्तांना मदतीसाठी आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हाधिकारी, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे भेट देऊन नियमाप्रमाणे मदत केली आहे. असे असतांना, फरांदे प्रसिद्धीचा स्टंट करीत आहेत. हे अत्यंत खेदजनक आहे.

त्या म्हणाल्या, महापालिकेच्या शाळेत या सर्व घरे जळालेल्या नागरीकांना निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. आमदार फरांदे यांनी तीथे जाऊन असहाय्य महिला, नागरीकांच्या हाती फलक दिले. त्यांना तीथे बसवले आणि आंदोलन केल्याचा अविर्भाव निर्माण केला. याच दिवशी भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार विरोधात राजकीय आंदोलन केले होते. त्यावर सबंध महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. तसेच भाजपच्या आमदार फरांदे यांनी पक्षाच्या नावाने सुरु असलेल्या आंदोलनासाठी भीमवाडीतील असहाय्य नागरीकांच्या हाती फलक देऊन केलेले आंदोलन देखील अयोग्य आहे. त्याचे भान त्यांनी ठेवले असते तर बरे झाले असते.

डॉ. पाटील म्हणाल्या, भीमवाडीतील नागरीकांविषयी खरोखर प्रेम असेल तर महापालिकेतील सर्व सत्ता त्यांच्याच पक्षाकडे आहे. या नगरसेवक, महापौर, उपमहापौरांनी या नागरीकांना काय मदत केली, आधी ते सांगावे. त्यानंतर राज्य शासनाकडे बोट दाखवावे. कारण राज्य शासन व आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. आमदार फरांदे यांनी महापौरांकडे जावे आणि या लोकांना घरे द्यावीत. शक्‍य ती अन्य मदत करावी. त्यांनी यातील काय केले आहे? केले असेल तर जाहिर करावे. मात्र गरीबांच्या असहाय्यतेचा लाभ घेऊन स्वतःच्या पक्षाचा आंदोलनाचा राजकीय अजेंडा पुर्ण करु नये. हे कोणालाही पसंत पडणार नाही. ...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EOlLoEsNi_cAX9jwHJm&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=39ca39857b9b662869c3d7f08f69a4e8&oe=5EF1B2A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com