माजी आमदार अनिल आहेरांनी न्यायडोंगरीची सत्ता राखली!

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी प्रतिष्ठेची करीत कॅांग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांच्या घऱच्या ग्रामपंचायतीत त्यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे अगदी प्रभागा- प्रभागात सभा घेतल्या.
Aher- Kande
Aher- Kande

न्यायडोंगरी : येथील निवडणूक शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी प्रतिष्ठेची करीत कॅांग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांच्या घऱच्या ग्रामपंचायतीत त्यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे अगदी प्रभागा- प्रभागात सभा घेतल्या. मात्र आहेर यांनी आपली सत्ता राखत कांदे यांना धुळ चारली. त्यामुळे आहेर यांनी आपला गड राखला. 

या निवडणूकीत यंदा आमदार कदम यांनी गावोगावी आपली ताकद लावली होती. त्यासाठी त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी न्यायडोंगरी गावात उमेदवारांना रसद पुरवीत त्यांच्यासाठी सभा घेतल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. त्याचा निकाल काय ालगतो याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. न्यायडोंगरी ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदार सुहासअण्णा कांदे यांनी हजेरी लावीत प्रभागा- प्रभागात चौक सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली होती. मात्र  शिवसेना पुरस्कृत नम्रता विकास पॅनलला पराभवास सामोरे जावे लागले. फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. येथे कॉंग्रेसचे माजी आमदार अनिलदादा आहेर, जिल्हा परि,द सदस्या महिला व बालकल्याण सभापती आर्किटेक्ट अश्विनी आहेर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे चौदा पैकी बारा उमेदवार निवडून आले. त्यांना या घरच्या ग्रामपंचायतीत निर्विवाद बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यात यश आले. 

तालुक्यात झालेल्या ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी आमदार अनिलदादा आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती आर्की अश्विनीताई आहेर  यांच्या नेतृत्वाखाली काही जागेवर एक  हाती तर काही जागेवर मित्र पक्षा सोबत एकत्रित सत्ता आल्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा कॉंग्रेसचे वर्चस्व निर्माण होण्याची आशा आहे. 

न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसची एक-हाती सत्ता आल्याचा दावा माजी आमदार आहेर यांनी केला आहे. यामध्ये न्यायडोंगरी, परधाडी, सावरगाव, बिरोळा, चांदोरा, रणखेडे, हिंगणे देहेरे, चिंचविहिर आदी ग्रामपंचायतींत कॉंग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून आले. तालूक्यातील भौरी ग्रामपंचायतीमध्ये देखील कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली. जातेगाव, बोलठान, माणिकपुंज, तांदुळवाडी, पोखरी, दहेगाव, पिंप्री, डॉक्टरवाडी, बाभूळवाडी आदी ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे कॉग्रेसच्या गोटात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com