नरेंद्र मोदी दरवाढीवर ब्र शब्दही का बोलत नाही!

महागाई विरोधात टीका करणारे आता मनमानीपणे वागत असून महागाईवर ब्र शब्दही बोलत नाही असा सवाल करत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅसची भरमसाट दरवाढ केली आहे. महागाईही गगनाला भिडली आहे, यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोप करत तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवली.
Congres yeola
Congres yeola

येवला : महागाई विरोधात टीका करणारे आता मनमानीपणे वागत असून महागाईवर ब्र शब्दही बोलत नाही (BJP Always doing agitation on inflation, now they sit quietly) असा सवाल करत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅसची भरमसाट दरवाढ केली आहे. (centre government hike rate of petrol, diesel & Gas) महागाईही गगनाला भिडली आहे, यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोप करत तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहीम (Congress starts signature campaign) राबवली.

येथील एकनाथ खेमचंद पेट्रोलपंप, विंचूर चौफुली येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या असून सरकार याकडे डोळेझाक करत आहे. यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे आधीच जनता आर्थिक संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी होणे अत्यंत आवश्यक आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

काँग्रेस पक्षातर्फे शहरातील प्रत्येक गल्लीत तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन महागाई विरोधात तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख यांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, तालुकाध्यक्ष ऍड. देशमुख, बळीराम शिंदे, शहरा कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, भगवान चित्ते, कैलास घोडेराव, अण्णासाहेब पवार, युवकचे अध्यक्ष मंगलसिंग परदेशी, अमित पटणी, बाबासाहेब शिंदे, मुसा शेख, मुकेश पाटोदकर, झेड.डब्ल्यू. ताडगे, शकील शेख, शिवाजी वाबळे, भगवान रसाळ, दीपक खोकले, विष्णू पवार, मच्छिंद्र मढवई, भाऊसाहेब गायकवाड, नामदेव कांगणे आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com