ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांचे मुंबईत निधन - Communist leader Roza Deshpande No more | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांचे मुंबईत निधन

संपत देवगिरे
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील पुरोगामी विचाराच्या आणि लढवय्या नेत्याच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीची हानी झाली. 

नाशिक : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील पुरोगामी विचाराच्या आणि लढवय्या नेत्याच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीची हानी झाली.  

विसाव्या शतकातील लढवय्या पिढीच्या प्रतिनिधी असलेल्या कम्युनिस्ट नेत्या रोझा देशपांडे या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि उषाताई डांगे यांच्या कन्या होत्या. विसाव्या शतकातील प्रमुख चळवळी व महत्त्वाच्या राजकीय, समाजिक घटनात त्यांनी सक्रीय भूमिका पार पाडली होती. १९७४ मध्ये झालेल्या मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत त्या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत रोझा देशपांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार बॅरिस्टर (कै) रामराव आदिक यांचा पराभव केला होता. त्यावेळी जनसंघाचे उमेदवार डॉक्टर वसंतकुमार पंडित, त्यांची सही माझ्या" स्वाक्षरीचे जग" या पुस्तकात आहे. या निवडणूकीत हिंदु महासभेचे उमेदवार विक्रम सावरकर होते. 

रोझा देशपांडे पुढे वडिलांबरोबर अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्षात गेल्या. गिरणी कामगारांच्या बरोबरच औषध कंपन्यातील कामगारांचे त्यांनी नेतृत्व केले होते. औषध कंपन्यात त्यावेळी महिला गरोदर राहिली, कि तीला नोकरीतून काढून टाकायचे. त्याविरुद्ध त्यांनी लढा उभारून हे धोरण बदलण्यास कंपन्यांना भाग पाडले. 

नाशिकचे वकिल दौलतराव घुमरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला त्या उपस्थित राहिल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सहभागी व्यक्तींना विशिष्ट दर्जा दिला जावा, याकरीता त्यांनी प्रयत्न केले. त्या समितीच्या त्या सदस्य होत्या. विसाव्या शतकातील लढाऊ पिढीच्या प्रतिनिधी म्हणून त्या सर्व परिचीत होत्या. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख