`माकप` नेत्याच्या उपस्थितीतच सदस्यांचा `राष्ट्रवादी`त प्रवेश सोहळा - Come forward for devolpment says NCP Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

`माकप` नेत्याच्या उपस्थितीतच सदस्यांचा `राष्ट्रवादी`त प्रवेश सोहळा

संपत देवगिरे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पाणी नसल्याने पंच्याऐंशी हजार आदिवासी मजुर, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी  रोजगारासाठी गाव सोडून बाहेर जातो. या भागातील पाणी अडवले तर हे स्थलांतर व शेतक-यांची दैना दुर होईल. त्यासाठी राजकीय मतभेद विसरुन विकासासाठी एकत्र या. विकासाला पाठींबा द्या, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. 

नाशिक : पाणी नसल्याने पंच्याऐंशी हजार आदिवासी मजुर, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी  रोजगारासाठी गाव सोडून बाहेर जातो. या भागातील पाणी अडवले तर हे स्थलांतर व शेतक-यांची दैना दुर होईल. त्यासाठी राजकीय मतभेद विसरुन विकासासाठी एकत्र या. विकासाला पाठींबा द्या, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. 

श्री. पाटील यांनी काल सुरगाणा तालुक्यातील पाणी योजनांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. यावेळी ते म्हणाले, या भागात दोन ते अडीच हजार मीलीमीटर पाऊस होतो. मात्र ते पाणी गुजरातला व अरबी समुद्राला मिळते. हे पाणी अडवून लहान लहान योजना राबविल्यास ते पाणी गोदावरी व गिरणा खोरे समृद्ध होईल. शेतीवर आधारित व्यवसाय उपलब्ध करून देता येतील. महिलांना पाणी आणण्यासाठी रात्री अपरात्री लांब जावे लागते. ते थांबेल. स्थानिकांचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबेल. त्यामुळे या विषयावर सगळ्यांनी वाद, मतभेद विसरुन एकत्र यावे. विकासाला पाठींबा द्यावा. 

श्री. पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकुल परिस्थितित जीवन जगत आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे हे पाणी गुजरात मार्गे अरबी समुद्रात वाहून जाते. हे पाणी या भागात लहान लहान साठवण बंधारे बांधून पावसाळ्यात पडणारे पाणी हे पुर्वेकडील गोदावरी खोऱ्यात व तापीच्या तापीच्या खो-यात वळवून पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी या वळण योजना उपयोगी ठरतील. स्थानिक आदिवासी बांधवांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तसेच तालुक्यात जलसिंचन योजना तयार करुन पाणी देण्यात येणार आहे. तालुक्यातील जलसंधारण विभागाचे साठवण बंधारे जलसिंचन कडे वर्ग करुन योजना राबविण्यात येतील. आधी स्थानिक लोकांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. सुरगाणा तालुक्यात कै. ए.  टी. पवार यांनी आदिवासी भागात अनेक सिंचन प्रकल्प बांधून आदिवासींच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. हेच वडीलांचे स्वप्न उराशी बाळगून आमदार नितीन पवार हे सिंचना योजना करीता लढा देत आहेत. तालुक्यात पाणी नसल्यामुळे पंच्याऐंशी हजार मजुर, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरीवर्ग रोजगार करीता बाहेर जात आहेत. हे स्थलांतर व शेतक-यांची दैना दुर करुन शेतीवर आधारित व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येतील. 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, विक्रमगडचे आमदार सुनिल भुसारा, माजी आमदार जयंत जाधव, जिवा पांडू गावित, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, आदिवासी सेवक चिंतामण गावित, मोतीराम गावित, श्रीराम शेटे, यशवंत राऊत बाबा, माकपच्या पंचायत समिती सदस्या सुवर्णा गांगुर्डे जलसिंचन विभागाचे एन.बी.शिंदे आदी उपस्थित होते. 
`माकप`ला धक्का
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सुवर्णा गांगोडे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडचिठ्ठी देत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जिवा पांडू गावित उपस्थित होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. 
 ...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख