`जाता जाता कोरोना  मला टिळा लावून गेला` - Collector Suraj mandhre found Covid19 Positive, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

`जाता जाता कोरोना  मला टिळा लावून गेला`

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहेत. अशातच जाता जाता कोरोना मला टिळा लावून गेलाच. पण लस घेतलेली असली माझे काही बिघडणार नाही. फक्त काळजी घ्यावी लागेल....असे कोरोनाचा संसर्ग झालेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले. 

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. (second wave of covid19 is Fade)  तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहेत. (Administration is preparing for third wave)  अशातच जाता जाता कोरोना मला टिळा लावून गेलाच. पण लस घेतलेली असली माझे काही बिघडणार नाही. फक्त काळजी घ्यावी लागेल....असे कोरोनाचा संसर्ग झालेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhre) म्हणाले. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कोरोना झाला आहे. शनिवारी (ता. ३) सकाळी त्यांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. दरम्यान, ते गृहविलगीकरणात राहूनच उपचार घेणार आहेत. 

दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर शुक्रवारी (ता. २) मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत झालेल्या स्मार्टसिटी आढावा बैठकीत व्यस्त असलेल्या जिल्हाधिकारी मांढरे यांचा कोरोना 

अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. नाशिक जिल्ह्यात दीड वर्षापासून कोरोनाच्या दोन्ही लाटींचे नियोजन करीत त्यांच्या तयारीत आघाडीवर होते. शुक्रवारी रात्री त्यांचा घसा दुखू लागल्याने त्यांनी 

कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते आठवडाभर विलगीकरणात राहणार आहेत. त्यांनीही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, पुढील आठवड्यात भेटू, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. 
...
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल दिवसभर काहीही त्रास नव्हता. रात्री घसा दुखू लागल्याने सकाळी टेस्ट करून घेतली. दुसरी लाट जवळपास ओसरली असताना व तिसऱ्या लाटेच्या तयारीला थोडा वेळ असताना या मधल्या टप्प्यात एकदा हा कोरोनाचा टिळा लागून जात आहे ही समाधानाची बाब आहे. पुढल्या आठवड्यात भेटूच. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)  

...

हेही वाचा...

आरक्षणाच्या वाटेवर मराठा-ओबीसी दीर होईल कमी?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख