Collector Suraj Mandhare solve the employment issue of Malegao | Sarkarnama

जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी सोडवला मालेगावच्या रोजीरोटीचा प्रश्‍न

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला. लॉकडाउनमुळे बंद असलेले यंत्रमाग सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे कोरोनाने कोमेजलेले मालेगाव पुन्हा पुर्वपदावर येण्यास सुरवात होणार आहे. 

मालेगाव : मालेगावची "जान' असलेल्या पॉवरलूमचा खडखडाट "करोना'मुळे गेले दिड महिना बंद होता. त्यामुळे सण उत्सवाच्या रमजानमध्येच नागरीकांची रोजीरोटी हिरावली होती. ही स्थिती पुर्वपदावर यावी यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला. लॉकडाउनमुळे बंद असलेले यंत्रमाग सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे कोरोनाने कोमेजलेले मालेगाव पुन्हा पुर्वपदावर येण्यास सुरवात होणार आहे. 
रमजानच्या पवित्र महिन्यात येथील नागरिकांना चांगल्या आरोग्यासोबतच रोजगार व अन्नधान्याचा प्रश्‍न शासनाच्या निर्णयांमुळे मार्गी लागला आहे. जीवनावश्‍यक १८ प्रकारच्या वस्तूंचे किट वाटपप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. श्री. मांढरे म्हणाले, की शहरात मोठ्या संख्येत मजूर असून, लॉकडाउनमुळे यंत्रमाग बंद आहेत. त्याचा परिणाम आर्थिक नियोजनावर झाला. यासाठी सेवाभावी संस्था व शासन मदतीला सरसावले आहे. शहरातील जमेतुल उलमा, सुन्नी जमैतुल उलमा, सुन्नी इस्लाम, शिया जमात, जमीयत अहेलेदीस, रझा ऍकॅडमी व आयटक संघटनेमार्फत गरीब व गरजू कुटुंबापर्यंत जीवनाश्‍यक वस्तुंचे सुमारे एक हजार ३०० किटचे वाटप करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून मजुरांना काम नाही. त्यामुळे त्यांच्या हाती पैसा नाही. शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा होत आहे. मजुरांच्या हाताला काम आणि रोजगार सुरळीत होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. शहरात बाहेरून येणारा मजूर नसल्यामुळे यंत्रमाग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक मजुरांना दिलासा मिळेल. यासाठी प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास शहरातील व्यवहार सुरळीत होतील. 
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745... दरम्यान, अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पॉवरलूमचालक, मालक व मजूर संघटनांच्या प्रमुखांसोबत त्यांनी याविषयी चर्चा केली. पॉवरलूमच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्‍न सुटेल. कंटेन्मेंट झोनबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार ११९ कंटेन्मेंट झोनचे फेरनियोजन करून आता केवळ ४५ कंटेन्मेंट झोन शिल्लक आहेत. या झोनबाहेरील पॉवरलूम लवकर सुरू करून मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटेल. पॉवरलूम मालक व चालकांना सुरक्षा पोस देण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, विविध विभागप्रमुख व पॉवरलूम संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. 
..  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख