`त्यांना` भेटण्यास जिल्हाधिकारी मांढरे कार्यालय सोडून बाहेर आले ! - Collector Suraj Mandhare Help senior citizen | Politics Marathi News - Sarkarnama

`त्यांना` भेटण्यास जिल्हाधिकारी मांढरे कार्यालय सोडून बाहेर आले !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

जिल्हाधिकारी सूरज मांढरे दोन दिवसांपूर्वी हा सर्व बडेजाव बाजूला ठेऊन चक्क कार्यालय सोडून कामासाठी आलेल्या एका दाम्पत्याला भेटण्यास रस्त्यावर गेले. रस्त्यावरच त्यांची अडचण समजून घेत त्यांचा प्रश्न सोडवला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यातील एका संवेदनशील अधिकारी दिसून आला.

नाशिक : जिल्हाधिकारी म्हणजे शिष्टाचार, अधिकार आणि शासकीय प्रतिष्ठेचे प्रतिक. या पदावरील अनेक अधिकारी त्याचा बडेजाव मिरवतात. मात्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे दोन दिवसांपूर्वी हा सर्व बडेजाव बाजूला ठेऊन चक्क कार्यालय सोडून कामासाठी आलेल्या एका दाम्पत्याला भेटण्यास रस्त्यावर गेले. रस्त्यावरच त्यांची अडचण समजून घेत त्यांचा प्रश्न सोडवला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यातील एका संवेदनशील अधिकारी दिसून आला.  

`शासकिय काम आणि सहा महिने थांब` ही म्हण सर्वज्ञात आहेच. स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष झाले पण ही म्हण अपवादानेच खोटी ठरली आहे. अपवादानेच काही शासकीय  कर्मचारी, अधिका-यांनी तसा प्रयास केला. कदाचीत यालाच कासवगती असेही  म्हटले गेले असावे. त्यामुळे शासकिय कामकाजाचा आयकॉन "कासव" देखील ठरू शकतो. कासवाच्या सगळ्या कला यात दिसतात. संकटात कासव आपले डोके आत घेऊन शेल मध्ये जाते. जसे कासव दिर्घायूषी तसेच सरकारी कामाची गतीही प्रदिर्घ काळ टिकून आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या एका कृतीने या सर्वांवर व्हाईट वॅाश मारला आहे. 

असाच प्रसंग नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. येथील कयुम आणि एरीका कोठावाला हे ज्येष्ठ पारशी दाम्पत्य त्यांच्या एका कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. या  कार्यालयात लिफ्ट नाही. मात्र वयोमानामुळे त्यांना पाय-या चढण्यात अडचण येत होते. प्रयत्न करुनही ते शक्य नसल्याने ते जिल्हाधिकारी इमारतीबाहेरच थांबले. हे जिल्हाधिकारी मांढरे यांना ते कळल्यावर ते स्वतःच कार्यालयाबाहेर गेले. त्यांनी दाम्पत्याला बसायला खुर्च्या दिल्या. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न समजुन घेऊन त्याचे तीथेच निराकरण करुन संबंधीतांना सुचना दिल्या. श्री. मांढरे यांची सह्रदयता पाहून हे जोडपे खुपच प्रभावीत झाले. त्यांनी मांढरे यांना आमच्या घरी भेट द्या अशी विनंतीही केली. श्री. मांढरे यांनी ती प्रेमाने मान्य केली. 

काम करताना अशी संवेदनशिलता, सकारात्मक दृष्टीकोण ठेवला तर कोणत्याही नागरिकाला अशी कार्यालये परग्रहावरची वाटणार नाहीत हे नक्कीच. शासन, प्रशासन आणि ही सरकारी कार्यालये सगळ्यांना आपलीच वाटतील. फक्त तीथे मांढरे यांच्यासारखे काही अधिकारी हवेत.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख