शहरातील डॅाक्टरांची ऑक्सिजनचा कार्यक्षमपणे वापर करावा

ज्या रुग्णालयांनी आपली क्षमता वीस आहे, मात्र दुप्पट रुग्णांना दाखल केले आहे, त्यांनी आपली माहिती नाशिकच्या महापालिका पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यामुळे सध्याच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करता येईल. वैद्यकीय व्यावसायिकांनी जास्ती जास्त ऑक्सीजन रुग्णांना कसा मिळेल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : ज्या रुग्णालयांनी आपली क्षमता वीस आहे, मात्र दुप्पट रुग्णांना दाखल केले आहे, त्यांनी आपली माहिती नाशिकच्या महापालिका पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यामुळे सध्याच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करता येईल. वैद्यकीय व्यावसायिकांनी जास्ती जास्त ऑक्सीजन रुग्णांना कसा मिळेल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.  

आज इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेचे पदाधिकारी यांची, मा. आमदार डॉ राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांच्याशी चर्चा झाली. ऑक्सीजन पुरवठा व मागणी यांमधील तफावत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्यांनी आणुन दिली. यावेळेस इंडियन मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकऱ्यांना सांगण्यात आले की, नाशिकची गरज ही साधारणपणे 125 टन पेक्षा जास्त आहे मात्र पुरवठा 85 टन पेक्षाही कमी होत आहे. त्यामुळे साधारणपणे  दररोज दिवसाला हा होणारा पुरवठा खूप कमी आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत कशी कमी करता येईल आणि सरकारी पातळीवर जास्तीत जास्त ऑक्सीजन नाशिकला कसा वळवता येईल यासाठी  इंडियन मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली. त्याचप्रमाणे इंडस्ट्रिअल ऑक्सिजन देखील मेडीकल वापरासाठी वळवता कसा येईल यावरही चर्चा झाली. त्याचप्रमाणें नुकताच झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळती व त्यामुळे झालेले मृत्यू ही घटना खूपच दुर्दैवी असून, अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व प्रशासनास इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचा या करोना युद्धात पूर्णपणे पाठींबा असेल आणि रुग्णांच्या हितासाठी आम्ही सर्व डॉक्टर्स कटिबद्ध आहोत असेही सांगण्यात आले.

त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकऱ्यांना काही  सूचना केल्या.ऑक्सीजनची होणारी गळती कमी व्हावी, ऑक्सीजन चांगल्या पद्धतीने कसा वापरावा व जास्तीत जास्त ऑक्सीजन  रुग्णांना कसा मिळेल याची काळजी घ्यावी,  यांसाठी  प्रयत्न करावेत.  त्याचप्रमाणे ज्या हॉस्पिटलला समजा 20 बेड असतील पण सध्या आता त्यांना कोरोना परिस्थितीमुळे 40 पेशंट दाखल करून घ्यावे लागत असतील तर,  अशा बेड ची संख्या वाढली आहे , तर अशा सर्व रुग्णालयांनी ने आपली बेड संख्या नाशिक महापालिका पोर्टल वर अपडेट करून घ्यावी,  जेणेकरून हा सर्व डेटा राज्यसरकार किंवा केंद्रसरकारला  सादर केला तर नाशिक जिल्ह्याला होणारा पुरवठा अधिक वाढवून घेता येईल तसेच रेमडीसेविरचा पुरवठा वाढवून घेता येईल असेही जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननिस, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ , खजिनदार डॉ विशाल पवार , माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे , डॉ. अनिरुद्ध भांडारकर, तसेच हॉस्पिटल ओनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे , डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. निलेश निकम , डॉ. निलेश जेजुरकर डॉ. प्रतिक्षित महाजन आदी उपस्थित होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com