मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती; अधिका-यांत `पॅचअप` नंतर गुन्हा मागे?

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेच्या प्रतिसादावरुन ग्रामविकास अन महसूलमध्ये जुंपली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दोन्ही विभागांमध्ये ‘पॅचअप' झाले.
मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती; अधिका-यांत `पॅचअप` नंतर गुन्हा मागे?

नाशिक : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेच्या प्रतिसादावरुन ग्रामविकास अन महसूलमध्ये जुंपली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दोन्ही विभागांमध्ये ‘पॅचअप' झाले.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशावरुन गुन्ह्याची फिर्याद रद्द करण्याचे पत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी आज सरकार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिले.

आढावा बैठकीमध्ये श्री. शिंदे यांनी जिल्ह्यातील कुटुंब सर्वेक्षणाचे काम पन्नास टक्के झाल्याची माहिती दिली. ही माहिती खोटी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन चोवीस तासात खुलासा सादर कऱण्यास सांगितले होते. पण त्यावेळच्या जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन बैठकी आणि नंतर कार्यालयीन सुटीमध्ये श्री. शिंदे मुदतीत खुलासा सादर केला नाही. परिणामी, श्री. वाघमारे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत श्री. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मग हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गांभीर्याने घेत श्री. मांढरे यांची भेट घेतली. मोहिमेच्या अनुषंगाने सध्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला. तसेच श्री. शिंदे यांनी मोहिम यशस्वी करण्याची ग्वाही दिली. कारणे दाखवा नोटीसचा खुलासा सोमवारी करण्यात आला. शिवाय नोटीसमध्ये उल्लेख केलेली कारवाई प्रस्तावित करण्यात येऊ नये अशी विनंती श्री. शिंदे यांनी खुलाश्‍यात केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे गुन्ह्याची फिर्याद रद्द करण्याचे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वारंवार दुर्लक्षाचा ठपका
कोरोना आपत्ती व्यवस्थापनात जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून श्री. रवींद्र शिंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नेमणूक कऱण्यात आली होती. त्याअनुषंगाने कार्यक्षम काम होणे अपेक्षित होते. मात्र कामाकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने वेळोवेळी समज देण्यात आली, पत्रे देण्यात आली, तरीही दुर्लक्ष कायम राहिल्याचे श्री. वाघमारे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX_xUaCT&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=5e8cde0217abd92a7754ee56f6a6776f&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com